Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

[१३५]                                                                               श्री.                                                                  २७ आगष्ट १७९५.                                
विनंति विज्ञापना. नबाबानीं विचारलें कीं तुह्मांस काय लिहिलें आहे. खरित्यांत मजकूर हेाता त्याअन्वयें बयान करून बोलण्यांत आलें जे, दोही दवलतींचे इत्यफाकानें कोणतीहि गोष्ट मुष्कील नाहीं, इत्यफाकाची सर्वोपरी आहे. खर्ड्यापर्यंत ज्या गोष्टी जाहल्या त्या, गुदस्तां तेथें करारमदार होऊन जें ठरलें त्याप्रमाणें, अमलांत येऊन, परस्परें सफाई रहावी हेंच दृष्टीस पडत असावें. हें न होतां करारांत गोष्टी आल्या त्याजवर अद्याप अंमल होत नाहीं. किस्त वगैरे कामें व्हावीं, सरकारचा तहनामा घेऊन हजरतींनी आपल्याकडील तहनामा त्याप्रमाणें द्यावा, हें कांहींच अमलांत न आलें. तहनाम्याचा मुकदमा भेटी झाल्यावर होईल ह्मणोन ईर्षाद जाला, किस्तीचे ऐवजाचे देण्याचें बोलणेंच नाहीं. कामें होण्याविषयीं राजाजीस आज्ञा जाहली, परंतु एकहि अमलांत येत नाहीं. बरदापूर वगैरेयाचा माविजा तालुका देवावा, हें कांहींच घडत नाहीं. तेव्हां दोस्ती व इत्यहादाची खातरजमा कशावरून समजावी? याचा विस्तार मला बहुत लिहिला आहे, ह्मणून गोविंदराव भगवंत यांचीं पत्रें आलीं होतीं. तींच वाचून दाखविलीं कीं, कराराप्रमाणें किस्त व तहनामा वगैरे अमलांत आले तर खातरजमा होईल. याप्रमाणें बहुत बोलण्यांत आल्यावर नवाब बोलिले कीं, तहनामा व करारमदार झाला त्यांत तफावत आणावयाची नाहीं, जर तफावत आणावयाचें मंजूर असतें तरी हमराही फौजेची बरतरफी व इंग्रजी पलटणाची रुखसत हें अमलांत कशास येतें ? करारमदाराबमोजीब अमलांत आणावयास ह्मणून ज्याजती खर्च फौज वगैरे तोडून तालुक्याची वगैरे आमदनी येईल त्यांत किस्तीचे सरबराईची तजवीज करावी याच योजनेंत होतों, तों दरमियान अलीजाह यांचा षिगुफा खडा झाला, याजमुळें शिबंदी खर्च जाजती चहडला, व तालुक्याचीही खराबी, मुख्य आमदानी तालुक्याची, त्याची अवस्था तशी झाली, याजमुळें दिरंगावर पडलें, तहनाम्याविषयीं टाळा दिला ऐसें नाहीं, एका दो शब्दांचा हरफेर बोलण्यांत येऊन तहनामा द्यावा घ्यावा, याजकरितां मुलाकातीवर ठेविले, वरकड कामाविशीं राजाजीस सांगितलेंच आहे, एकएक उलगड्यांत येत जाईल, यास टाळा दिला असें मनांत येऊं नये संशय नसावा, समंजस आहेत त्यांनीं कियास करून ध्यानांत आणावें जे वांकडी चाल करावी असें लक्षण आह्मांकडून काय दिसलें, दौलतीत प्रसंग विलक्षणही येतात, त्या अडचणीस्तव बोलावेंही लागतें, त्यास करारांत गोष्ट आली ते खचित आहे, किस्तीचा मुकदमा तर अलीजाहा यांचा मझेला यापासोन फरागत होऊन त्यांचाही फैसला करण्यांत येईल, तुमच्याकडील भरणा व इकडील खिसारा दोहींचा निर्वाह एक समयावच्छेदेंकरून कसा होतो? संकटच आहे, वरकड कामाविषयीं ताक़ीद करितों. एक एक उलगडावें ह्मणोन बोलिले. याचा जबाब मी दिला जे, याविषयीं मागती मी अर्ज करीन ते दर्याफ्त होऊन आज्ञा व्हावी. याप्रमाणें बोलणें झाल्यावर निरोप घेऊन घरास आलों. र।।। छ ११ माहे सफर. हे विज्ञापना.

छ १५ सफर.
मु॥ भागानगर.
टप्यावर.