[७१]                                                                                श्री.                                                                       १७ जुलै १७९५.                                                       
विनंति विज्ञापना. फतहुल्लाखान. याचा पुत्र महमद अनवरखान कलबर्ग्यास आहे. त्याचें पत्र नवाबास आलें. त्यांत मजकूर कीं, अलीज्याहा बहाद्दूर यांनीं सुरापुरास खिलत व जवाहीर पाठवून लिहिलें कीं, सगरचा किल्ला तुह्माकडे करार केला, तुह्मीं खातरजमईनें बंदोबस्त त्या मकानाचा करून आपले जमयतसुद्धां हलकी नव निगादास्त करून जलद कलबगें व चितापूर व चार महाल या प्रांतास यावें, यांत तुमचा मजुरा आहे. त्याजवरून बेडर मजकूर काबू वख्त पाहून जागा व मकानें घ्यावयाचे उद्देशें जमयत ठेवून हरकंत करणार, नदी उतरावयाकरितां ठोकरे वगैरेचा सरंजाम होत आहे, यामुळें दंडवती वगैरे मकानांतही शिबंदीची निगादास्त आपलाले संरक्षणाविषयी होत आहे. इत्यादिक मजकूर लिहिला होतां. त्यास हें पत्र नवबांनीं पाहून आह्मासं सांगितले कीं, येविशीं तुह्मी मुरापूरकर यांस पत्र लिहावें. त्याजवरून सुरापूरकरास पत्र लिहिलें. त्याची नक्कल सेवेसी अवलोकनार्थ रवाना केली आहे. त्यावरून ध्यानांत येईल. र।। छ २९ जिल्हेज. हे विज्ञापना.

सुरापूरकरास पत्र लिहिलें त्याचीं नक्कल त्याचे जुनावरच आहे. सबब येथें बार केलें नाही.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries