Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[६९] श्री. १७ जुलै १७९५.
विनंति विज्ञापना. मुसारेमू आपले जमयत व तोफखान्यासुद्धां संगारडी पेठेस गेले. संगारडी भागानगराहून अठरा कोस आहे. त्यास मुसा मजकूर यानीं पेठेस मोर्चे लावून तोफाची मारगिरी करून पेठ घेतली. हिकडील लोक फार जाया झाले. पेठेंत वस्ती नव्हती. प्यादे मात्र होते. ते निघून गेले. सांप्रत मागाहून अजम साहेब व घासीमिया यांस जमीयतसुद्धां रवाना केलें. त्यास अवघे मिळून सध्यां पांचशें स्वार आहेत. त्यास पांच सात दिवस दरगाहजवळ भागानगराहून तीन कोसांवर मुक्काम होता. रात्रंदिवस चौकी पहारा हुशारीनें होते. प्रस्तुत दरगाहावरून, कुच करून पुढें संगारडी पेठेचे सुमारें गेले. काणेही प्रकारें मुसारेमू यास जाऊन मिळावें. नाहींतर शिद्दी अबदुल्लाखान याप्रमाणें झाल्यास, बदलौकिक ह्मणून विचारांत पडून जातात. शिद्दी अबदुल्लाखान ठार झाले. लोक गारत होऊन राहिले. ते परागंदा झाले. जखमी अद्यापि येथें येतात. सांप्रत वर्तमान कीं, बेदरचा किल्ला घेतल्यानंतर सदाशिव रेड्डी आपले जमयतसुद्धां लागभाग पाहून गायब आहे. र।। छ २९ जिल्हेज. हे विज्ञापना.