Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[६८] श्री. १७ जुलै १७९५.
विनंति विज्ञापना. अलीज्याहा बहाद्दूर गेल्यानंतर शहरचे दरवाजे बंद करून बिनविले. याचा तपशील पेशजी विनंति पत्रीं लिहिण्यांत आलाच आहे. त्यानंतर शहरचे आसपास गिर्दबगीर्द फौज ठेवून चौक्या, पहारा, तलावा, छबिना रात्रंदिवस फिरतं असावा, ह्मणून नवाबांनीं राजाजीकडे सांगून पाठविलें कीं, या कामास सरदाराची नेमणूक करावी, व सरदारास हुकूम असावा कीं, काय दिवसा व काय रात्रीं तेलंगा अथवा कानडा प्यादा तरवारवाला अथवा बंदूकवाला जो आढळेल त्यास पाहतांच त्याचे कान व नाक साफ करीत जावें, दुसरे परवानगीचा उजूर न ठेवा. याप्रमाणें हुकमी फर्दा लिहून सरदारापाशीं द्याव्या. नवाबाकडील चोपदार राजाजीकडे येऊन सांगितलें, त्याजवरून मशारनिल्हेनीं दौलतखान कलमनुरीकर व सास्तखान व सुलतानखान व लोदीखान व आपली खासगत जमयत वगैरेची नांवनिशी लिहून जागाजागा अलंगा व हद्दी करार करून दिल्या व त्यास नवाबाचे हुकमाप्रमाणें एक एक फर्द तयार करविले. तेसमयीं कोनेर बाबूराव आह्मांकडील कांहीं कार्याकरितां गेले होते, वे रोषनराय व रामभट वगैरे मंडळी होती. त्यांत कोनेर बाबूराव यांनीं बोलले कीं, नवाबांनीं या गोष्टीचा हुकूम केला हें काय समजून ? भागानगर शहर व मुलूख तेलंगा, सरकारची शिबंदी कानडी, त्यांत या प्रांतीचे तमाम मुसलमान लोक प्यादगिरीचें कसब करून पोट भरितात, त्यास मुसलमानी बोलणें देखील येत नाहीं, सरदार अनिवार, हुकूम झाला पुरे, अनर्थ करतील, भलत्यास धरून नाक कान घेतील, सदाशिव रड्डी याचे प्यादे तेलंगे ह्मणून इतकें करावें, तरी याचा विचार राहणार नाहीं, या सरकारचे लोक बाहेर गांवखेड्यांस जाऊं लागतील, त्यांस कठीण पडेल. तेलंगे लोक विचार न पाहतां असेंच करूं लागतील तेव्हां रायरायासही विचार पडला. उत्तर केलें कीं, हुजूरचा हुकूम यास आह्मीं काय करावें, तथापि सरकारचा हुकूम पाहून कांहीं दूसरी तजवीज होत असल्यास सांगावी. त्याजवरून, कोनेर बाबूराव यांनी सांगितलें, सरदारास हुकूम असा तरी करावा कीं, तेलंगे अथवा कानडे प्यादे जे चौकीपहा-यांत सांपडतील त्यास धरून बसवीत जाणें, याचा अर्ज संध्याकाळी हुजूरांत करीत जावा, पुढें जसा इर्षाद होत जाईल त्याप्रमाणें अमलांत आणीत जावें. याप्रमाणें सरदारांस आज्ञा झाल्यास ठीक, नाहीं तर कबाहात फार होईल. ह्मणून सांगितल्याप्रमाणें फर्दा करून सरदारांस दिल्या. र।। छ २९ : जिल्हेज. हे विज्ञापना.