Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[५४] श्री. ८ जुलै १७९५.
विनंति विज्ञापना. नवाबानीं येथून मुसारेमू यास अघाडीस त्याचें जमीयतसुद्धां रवाना केलें. घासीमिया व महमद आजीमखान या उभयतांसही रुखसतीचीं पानदानें दिलीं. छ १७ रोजीं त्याचे डेरे गोवर्धनाचे बागेपाशीं झाले. छ १९ रोजीं उभयतां निरोप घेऊन डेरे दाखल झाले. पागा चरईस आहेत, त्यांस बोलावणीं गेलीं आहेत. येथें थोडेबहुत लोक त्यांसहित बाहेर निघून इसामिया व जोतसिंगखंदारकर व सुभानखान रोषनखानाचा भाऊ वगैरे सरदारांची नेमणूक झाली. सर्वत्रांचे लोक तालुक्यांत आहेत, तेथून आणविले. आल्यानंतर जमा होतील. र।। छ २० जिल्हेज. हे विज्ञापना.