Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[४२] श्री. ३ जुलै १७९५.
विनंति विज्ञापना. नवाबांनीं बेदरच्या. किल्ल्याच्या बंदोबस्ताकरितां येथून शिद्दी अबदुला-व-रुद्दौला यास सातशें गाडद व तीनशें स्वारसुद्धां रुखसत देऊन छ १४ जिल्हेजीं रवाना केलें. पट्टणचरू सदाशिवपेंठ हा रस्ता नीट चालत नाहीं. सबब शिद्दीस जनवाडे, धोबीपेंठ कुहीरचे मार्गानें बेदरास जाण्याची ताकीद होऊन रवानगी झाली. शिद्दी मजकूर कूच करून सांगितल्याप्रमाणें त्या मार्गीं गेला.
र॥ छ १५ जिल्हेज. हे विज्ञापना.