Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

[१०३]                                                                               श्री.                                                                  ९ आगस्ट १७९५.                                 

विनंति विज्ञापना. नवाबाचे येथें अलिजाबहादूर यांचे येथील बेदराहून अखबार छ १८ मोहरमची आली. ते नवाबांनीं वाचून आह्मांकडे पहावयास पाठविली. त्याचा तरजुमा हिंदवी येणेप्रमाणें :- 

जबानी वेंकटराम व रंगापा नवमुलाजम सरकार.

१ हजुरातून नवा महाल तयार करविला होता. तेथें अलिजाह राहिले आहेत; व सदाशिवरड्डी फत्तेदरवाजानजीक, बागांत मीर अलम राहिले होते तेथें, सदाशिवरड्डी आपले मुलांलेकरांसुद्धां आहेत.

१ सयेफजंग यांचे पुत्र अजमुलउमरा ज्या मकानांत राहिले होते तेथें राहिले आहेत. छ १३ मोहरमीं सयेफजंग यांचे ज्येष्ट पुत्रास बेदरची किल्लेदारी करार जाली.

१. आंदोलाहून जमयेत निघोन आली, ते नागझरीपासून मंगळवारपेठपावेतों उतरली आहे. कुलजमयेत स्वार प्यादे पंधरा हजार किल्ल्याचे आंत बाहेर उतरले आहेत. लोकांचे ह्मणण्यांत वीस हजारपावेतों आहे.

१ सिपाही लोकांस तसदी फार आहे. दोन दोन महिने लोकांचे चढले आहेत. सदाशिवरड्डी आज आज उद्यां उद्यां करतात.

१ सुरापुराकडून कांहीं जमयत आली नाहीं.

१ तळघाटचा व वासलगंजचा दोन्ही दरवाजे बंद आहेत. खिडक्या मात्र उघड्या आहेत.

१ छ १४ चे रात्रीं व छ १५ चे प्रातःकाळ माहे मोहरमीं अलिजाह यांनीं, कोणी मषाएख पिरजादा आहे त्याचें नांव समजलें नाहीं त्याचे लेकीशीं बदिउलाखान याचे विद्यमानें निका लाविला.

१ फत्तेदरवाजा उघडा आहे. दरवाजाचे आंत बाहेर कर्नाटकी प्यादे व रोहिले पन्नास असामींची चौकी आहे.

१ वर्तमान आहे कीं कांहीं जमयेत अवशाकडे जाणार. बाकी जमयेत सरकारचे फौजेचे मुकाबल्यास येणार.

१ दररोज दरबार प्रातःकाळापासोन दीड प्रहर दोन प्रहरपावेतों होतो. रात्रींही त्याचप्रमाणें दीड प्रहर दोनप्रहरपावेतों होत आहे.

१ फत्तेदरवाजा चार घटिका दिवस आल्यानंतर उघडते.

१ धारणगल्याची.

८।।. जोरी दररुपयास २० शेर.
८।५ गहूं पंध्रा शेर.
८।६ हरभरे सोळा शेर.
----
१२
एकूण बारा कलमें अखबारींत लिहिलीं आलीं, त्यावरून विनंती लिहिली असे. र।। छ २३ मोहरम. हे विज्ञापना.