Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[३८] श्री. ३ जुलै १७९५.
विनंति विज्ञापना. अलीजाह बहादूर साहेबजादे व सदाशिवरड्डी यांजकडे नवाबांनीं खुषरकमखान अलीजाह याचा गुरू वस्ताद यास व सदाशिवरड्डी याचा वकील पेशजी येथें दिनकरराव ह्मणून आहे त्यास या उभयतांस रुखसत त्यांजकडे जाण्याची छ १४ जिल्हेजीं दिल्ही. साहेबजादे व रड्डी याशीं बोलण्याचे पर्याय सांगितले. रवाना होणार. यांचे समागमें मेवेजातच्या बहंग्या वगैरे सरंजामही रवाना करावयास तयार झाला आहे. बक्षीबेगमही साहेबजादे याचे समाधानास जाणार, हें दाट वर्तमान आहे. र॥ छ १५ जिल्हेज. हे विनंति.