Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)

[१७६]                                                                       श्री.                                                  ३ एप्रिल १७२७.

पु॥ श्रीमत्परमहंसबावा स्वामीचे सेवेसी :-
विनंति विशेष. स्वामीनीं पत्र पाठविलें तेथे लिहिलें कीं, गोठण्याहून स्वार होऊन गोव्याकडे गेलों, तेथून कोल्हापुरास जाऊन श्रीचें दर्शन जालें, तेथून उदाजी चव्हाणाची भेटी घेऊन पुढें घोरपडे यांकडे जावयाचा विचार केला. तो वाटेचें उष्ण व फार मार्गहि चालत नाहीं, गोमूत्र मिळण्याचे संकट जाणोन, तेथूनच फिरलो ते पालीस आलों, तो ज्वराची व्यथा निर्माण जाली. ह्मणोन लिहिले. तरी, श्रम करितां ज्वरे पीडा केली. त्यास उपाय करून, आरोग्यता करून घेतली पाहिजे. धावडशीस उदक असोन गुराणसास प्राप्त नाहीं, ऐसे देखोन, तळें थोर इमारतीचें बांधावयास जागा, उदकास पूर्ण पडे असा, पाहोन, तळेयाचे कामास कारखाना लाविला आहे, उदक आह्मास वाटेवरी आहे; सर्वांस कामास येईल, ह्मणोन सविस्तर लिहिले, त्यावरून कळले. तरी स्वामीनें जो उद्योग आरंभिला तो उत्तम आहे. पाणीहि लागेल. सर्वांस, गुरामाणसांस, कार्यास येईल. श्रेयस्कर आहे. बहुत काय लिहिणे. कृपा असो दीजे. हे विनंति.