Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
तथापि हल्लीं चौकशीकरितां पेशजी दिव्य होऊन राजपत्रें जालीं, त्याजवर शिक्केही जाले, तथापि दिव्याचे मजकुरातून तुह्मास विभाग न द्यावा ऐसें होत नाहीं, याप्रमाणें सिध्द जाहालें. यास्तव पुन्हां चौकशी करावी ह्मणून लक्ष्मणराव शिर्के यांणीं विनंती करून आठ हजार रुपये सरकारांत नजर देऊन रायरी मामल्याचे सरदेशमुखीचे दरोबस्त वतन आपल्याकडे चालतें करावयाविशीं पत्राची यादी करून घेऊन त्याप्रमाणें पत्रें तयार करविलीं. त्याजवर शिक्के व्हावयाचे राहिले आहेत. तीं पत्रें व यादी रद्द करून त्यावरून कान्होजी शिर्के यांणीं सौ॥ सकवारबाईसाहेबांचे हिमाइतीनें आग्रहामुळें दिव्य केलेसें करून दोनी वतनास देवजीराव शिर्के याशीं संबंध नाहीं ह्मणून राजपत्रें घेतलीं. त्यावरून दोनी वतनाचे धनी लक्ष्मणराव शिर्के होतात ऐसें घडत नाहीं व गोतमहजरापूर्वी रामोजी शिर्के यांणीं पूर्वील पत्राचा लोप करून लोभास प्रवर्तून आपले साधकांचीं दुसरीं पत्रें घेतली ऐसे चंदीचे साक्षीमोझे पुरले. त्यामुळें विठोजीराव व दौलतराव व बहिर्जीराव व कान्होजीराव शिर्के इनसाफास उभे न राहात. सबब दोन्ही वतनाशीं त्यांस संबंध नाहीं ह्मणून राजपत्रें तुह्माजवळ आहेत. त्यावरून दोनीं वतनें तुमचींच कैसी होतील ? यास्तव दिव्यपत्रापूर्वीं शाहूहाराज यांणीं सरकारकून व मुत्सद्दी व जमीदार मिळवून बावन असामियांचे विद्यमानें चंदीचे साक्षीमोझे मनास आणून मामले रायरी शिर्काण येथील सरदेशमुखीचें वतन वडिलांचे, तेथील वडीलपण शिक्का मानपान तश्रीफ आधीं कानोजीराव बिन रामोजीराव शिर्के यांणीं घ्यावी, त्याचे मागून मानपान तश्रीफ पिलाजीराव बिन गणोजीराव शिर्के यांणीं घ्यावी, व सुभा दाभोळ येथील देशमुखीचें वतन अजरामऱ्हामत गणोजीराव याचे नांवें यास्तव तेथील वडीलपण शिक्का मानपान तश्रीफ आधीं पिलाजीराव बिन गणोजीराव यांणीं घ्यावी. त्याचे मागून मानपान तश्रीफ कान्होजीराव बिन रामोजीराव यांणीं घ्यावी. व दोन्ही वतनाचें उत्पन्न निमेनीमप्रमाणें दोघांनीं वांटून घ्यावें. ह्मणून गोतमहजर शिक्यानिशी शके १६४० विलंबीनाम संवत्सरीं करून दिल्हा त्या अन्वयें राजपत्रें जालीं. सदरहू महजराचे अन्वयें वंशपरंपरेनें चालावयाविशी तळेगांवचे मुक्कामीं खंडेराव दाभाडे सेनापति व मातबर सरदार यांचे विद्यमानें कान्होजीराव शिर्के यांणीं देवजीराव शिर्के यांचे नांवें प्लवंगनाम संवत्सरी श्रीशिर्काईंची व काशींत महापातकें केल्याची शपथपूर्वक पत्र लेहून दिल्हें. ऐसें असतां फिरोन कजिया करूं लागले. तेव्हां शाहूहाराज यांणीं शिर्के याशीं पूर्वील साहेबांचें देणें आहे. यानिमित्यें सत्य-सुकृत व थोरले महाराजाची शपथ व गंगा स्मरोन निवाडा करावा ह्मणून कैलासवासी ताराऊसाहेब यांशी विनंती करून गंगोदकाच्या कुप्या व श्री बाळकृष्णदेवाच्या तुळशी व यादवभट उपाध्ये व रघोजी भोसले व राणोजी भोसले व कित्येक मातबर सरदार यांबरोबर उभयतां शिर्के यांशीं देऊन त्याजकडे पाठविलें. त्यांणीं मागील माहितगारीनें इनसाफाची छान करून महजराचें अन्वयें सर्वांचे विद्यमानें निवाडा करून देवजी शिर्के यांचे नांवें दुर्मतिनाम संवत्सरीं निवाडपत्र करून दिल्हें. येकूण तिन्हीं पत्रें विचार होऊन पायशद्ध जालीं. त्याच अन्वयेंकरून हल्लीं हें पत्र दिल्हें असें. तरी सन इहिदेचे सालीं पंचाइतमतें निवाडा होऊन तुमचे नांवें निवाडपत्रें करून दिल्हीं तीं यथार्थ आहेत. त्याजवर तुह्मी शिक्के करून घेऊन त्याप्रमाणें तुह्मीं व त्यांनीं चालावें. त्या पत्रांत वरकड विभागाचा मजकूर सर्व यथास्थीतच उगवला आहे. परंतु गोतमहजरीं मामले रायरी शिर्काण येथील सरदेशमुखीचे वतनाचे वडीलपण शिक्का मात्र लक्ष्मणराव शिर्के यांचे वडिलाकडे. याप्रमाणें ठरलें असतां शिक्यासंबंधीं उत्पन्न नक्त व वस्त्रें दरोबस्त लक्ष्मणराव शिर्के याजकडे, वरकड उत्पन्नापैकीं निमे तुह्मांकडे, असें लिहिलें आहे तें निवाडपत्रीं समजानें लिहिलें नाहीं. यास्तव पेशजी कैलासवासी शाहू महाराज यांणीं गोतमहजरीं ठराव केला आहे. त्याप्रमाणें मामले रायरी शिर्काण येथील वडीलपण शिक्का मात्र लक्ष्मणराव शिर्के याजकडे. वरकड दरोबस्त वतनसंबंधीं उत्पन्न निमे त्याजकडे व निमे तुह्मांकडे, याप्रमाणें ठराव केला आहे. त्याप्रमाणें तुह्मी आपला विभाग अनभवीत जावा. सुभा दाभोळ येथील देशमुखीचे वतनाचा कजिया आहे त्याचा विचार पेस्तर मनास आणून आज्ञा होईल त्याप्रमाणें वर्तणूक करणें.