Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)

बरें ! पुढें कार्तिकमासी तरी आले तरी कार्ये होतील. इकडील साद्यंत वर्तमान श्रीमंत राजश्री नानास्वामी, श्रीमंत राजश्री भाऊस्वामी, र॥ रामचंद्रबाबा, श्रीमंत र॥ दादा, यांजला पत्रें लिहिली आहेत. श्रीमंत साताराकडे, पुणेयांकडे असिले तर पत्र हेच काशीद घेऊन जातील. कूच असिले तर अजुरदार काशीद करून देऊन, अगर ह्याच लष्करीं पावत असें असिलें तर सोबत उत्तम लष्करी पावत असें लावून देऊन, श्रीमंताजवळ पावती करणें. तेथून जबाब येईल तो रवाना करणें. श्रीमंतांनी वराता आह्मांवर केल्या, त्यास पठाणाचे दंगेयाकरितां श्रीकाशी, प्रयाग, उजाड जालीं; आगरेयास उभयतां सरदार व वजीर एकत्र जालें; सबब मातब्बर सावकार दिल्लीस गेले; हुडीचे काम बंद जालें; फरकाबाद, मोहू, समसाबाद व कनवज, मेरट, जहानाबाद, शहाजापूर, लखनौ वगैरे मातब्बर शहरें, जयनगरसुध्दा लुटिली, मारिली गेली. त्याजवर मातब्बर सावकारांची दिवाळी निघाली, कितेक मारले गेले. याजकरितां छत्रपूरचे गामास्ते सावकाराचे होते ते कामकाज करीत होते तेही बंद जालें. शहरीं नवरंगाबादेहून तमाम लिहिली आलीं, आगरेयाहून आलीं, गेलीं, जे कजिया जाला, या समयीं एकंदर हुंडी न करणें, देणें न करणें. याजकरितां तमाम सावकारा बंद जाला. रोख रुपये घेऊन गेले तरी एक रुपयाची हुंडी होत नाहीं. परगणेयाचें वर्तमान तर, आश्विनमासीं गारा पडल्या, खरीफ बुडालें. दुसरेयाने फाल्गुनमासीं पडल्या. रब्बी बुडाली. असा नास होऊन शेताआड शेत वचले. त्यास धान्यास कोणी पुसत नाहीं. याजकरितां तमाम रयत पाटिल पळतात. चवथाई वसूल या सालांत जाला नाहीं. गल्लेयाची खळी तैशींच टाकून पाटिल पळाले. गल्लेयासी कोणी घेत नाहीं. बहुत काय लिहिणें. लोभ असो दीजे. हे विनंति.