Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)

तिकडे तांब्रांच्या फौजा जुलपुकारखान जाऊन चंदीस वेढा घातला. ते समयीं गणोजीराव मोंगलाचे चाकर असतां त्यांणीं स्वामीस व सौ॥ ताराबाई व राजसबाई व राजकुवरसहित चंदींतून काढून रात्रीचीं अरणीस पाठविलीं. त्या सेवेमुळें राजश्री राजारामसाहेब संतोषी होऊन काय पाहिजे तें मागा ऐसी आज्ञा केली. तेव्हां गणोजीराव यांणीं विज्ञप्ति केली जे, दाभोळचे देशमुखी इदलशहांनीं अनामत केली होती ते त्यांणीं आपले बाप पिलाजीराव यांसी दिल्ही. परंतु, भोगवटा न जाला. त्या वतनावर कोणी वतनदार नव्हता ह्मणून चंदीचे मुक्कामीं राजश्री खंडो बल्लाळ चिटणीस यांस दिल्ही आहे. ऐसियासी आपणांस पुत्र जाला आहे त्याचें नांव पिलाजीराव ठेविलें असें. तरी तें वतन आपणांस द्यावें त्यावरून राजश्री खंडो बल्लाळ यांचें समाधान करून त्यास दुसरें वतन देऊं केलें आणि दाभोळचे देशमुखीचें वतन गणोजीराजे यासी देऊन पत्रें करून दिल्हीं; व खंडो बल्लाळ यांस पत्रें दिल्हीं होतीं तीं घेऊन गणोराव याजपाशीं दिलीं. येळुराहून स्वामी स्वार होऊन स्वराज्यांत स्वदेशीं आले. त्याज समागमें रामोजी बिन कान्होजी शिर्के गणोजीरायाचे पुतणे देशीं आले. त्याजपाशीं वतनाचीं पत्रें देऊन इकडे पाठविलें. देशीं आल्यावर वतन चालवावयाबद्दल ताकीदपत्रें मागितलीं. तीं राजश्री स्वामींनीं देवविलीं. त्या पत्रांत आपलें नांव घालून राजपत्रें घेतलीं; आणि वतनाची कमावीस करूं लागलें. आपणास वतनास दखल होऊं येत नाहीं, यामुळें याचा आमचा कथळा होऊ लागला आहे. त्यास त्याचा आमचा करीना मनास आणून गणोराव यांचें वतन त्याचे पुत्रास व आपण बंधू आपणांस दिल्हें पाहिजे ह्मणोन विदित केलें. तें स्वामींनीं अंत:करणांत आणून याची व त्याची मनसुबी करावी, स्थळ व गोत लाऊन द्यावें ऐसें करून विठोजीराव व दौलतराव व कान्होजीराव व बहिरजीराव शिर्के यांशी हुजूर आणून गोतांत राजीनामे द्या व स्थळांत जाऊन वेव्हार सांगा. गोतमुखें न्याय होईल त्याप्रणें वतन चालविलें जाईल, ऐशी आज्ञा केली. त्यास विठोजी व वरकड मान्य न होत व राजीनामे न देत. नसती दिकत घेऊन कथळे करूं लागले. त्या उपरी स्वामींनीं चंदीस सर कारकून होते त्यांध्ये जे हजीर आहेत व राजश्री शंकराजी मल्हार मोंगलाईंतील सैदाचे तर्फे जे आले होते व राजश्री मानसिंग मोरे व खंडेराव दाभाडे सेनापति हे चंदीस राजश्री काका स्वामीसंनिध होते त्यास बलाऊन व राजश्री सुलतानजीराव निंबाळकर सर लष्कर व वरकड भले लोक व कितेक परगणियांचे देशमुख व देशपांडे व मोकदम व मक्ष्तसर यांस सभेस बसवून त्यांस यांचा करीना पुशिला तेव्हां समस्तांनीं विदित केलें कीं, देवजी शिर्के यांनीं करीना विदित केला तो यथार्थ आहे. वतन गणोजीराव शिर्के यांसी दिल्हे. रामोजी शिर्के त्याचे पुतणे ह्मणून त्याणीं वतनाचीं पत्रें त्यापाशीं देऊन इकडे पाठविले. तेवडियानेंच रामोजी व त्यांचे भाऊ वतन अनभवूं लागले. वतनाचें खावंद पिलाजी शिर्के हे खरे ऐसें साक्षपूर्वक विदित केलें. त्यावरून विठोजी व दौलतराव व कान्होजीराव व बहिर्जी शिर्के हे खोटे ऐसें कळों आलें. त्यास सदरेवरून उठवून लाविलें.