Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
स्वामीस थोरले कैलासवासी स्वामीचें वचन प्रतिपाळावें व कैलासवासी राजश्रीकाका स्वामीचें प्रतिपालन करावें. हें अगत्य ह्मणून तुह्मावर स्वामी कृपाळू होऊन मामले दाभोळचे देशमुखीचें वतन तुह्मासच बहाल केलें. असें तुह्मीं व तुमचे पुत्रपौत्रादि वंशपरंपरेनें वतनाचा उपभोग करून दंडक प्रमाणें वतनाची सेवा करीत जाणें. या वतनास रामोजी शिर्के याचे पुत्रास व विठोजी व दौलतराव शिर्के यांस संबंध नाहीं ह्मणून व रायरी मल्याचें पत्र राज्याभिषेक शके ४४ हेमलंबीनाम संवत्सरचे राजा शाहू छत्रपती यांचे पिलाजीराव बिन गणोजीराव व देवजीराव बिन पिलाजीराव शिर्के सरदेशमुख मामले रायरी यांचे नांवें दिल्हें. वतनपत्र ऐसजे:- तुह्मांध्ये राजश्री देवजी शिर्के यांनीं विदित केलें कीं, रायरी मामला महाल बारा येथील सरदेशमुखीं शिर्के याची पुरातन निजामशहा पातशानीं दिल्ही होती ती बहुत दिवस भोगवटा चालिला. त्याजवर आपले वडिलांनीं वतनावर मुतालीक दलपतराव ह्मणून पातेना परभू ठेऊन आपण पातशाही मनसब दौलत करूं लागले. त्या उपरी जावलीकर चेपरराव यांनीं रायरी किल्ला घेतला. त्या कारकीर्दीस मुतालिक तोच सरदेशमुख ह्मणून वतनाचा भोगवटा करूं लागले. त्यानंतर स्वामीचें राज्य जालें तेव्हां दलपतरायास कांहीं हक्काची मोहन करून दिल्ही. तेवडयावर चाकरी करून वतन अनभविली आहे. त्या उपरी स्वामी राज्याधिकारी होऊन चंदीस गेले. तिकडे मोंगलांच्या फौजा नामजाद झाल्या. चंदीस वेढा जुलपुकारखानानें घातला ते समयीं गणोजीराव व त्याचे पुतणे रामोजी शिर्के मोंगलाईत होते. त्यास कौल देऊन चंदीस आणिलें. दौलतेचा सरंजाम करून चालवीत होते. त्या प्रसंगी वतनदाराचीं पुरातन वतनें ज्यांचीं त्यांस दिल्हीं व कित्येकांस नवीं करून दिल्हीं, ते समयीं गणोजीराव व रामोजीराव यांणीं रायरी मामलेयाची सरदेशमुखी पुरातन आपली आपणास द्यावी. मुतालिक दूर करावा ह्मणून विनंति केली ते प्रसंगीं आयाजी दलपतराव मुतालिक दूर करावा ह्मणून विनंति केली ते प्रसंगीं आयाजी दलपतराव मुतालिक चंदीस आला होता त्याजला स्वामींनी शपथ घालून करीना पुशिला; तेव्हा तो आपण मुतालीक ह्मणोन कबूल जाला. त्याजवरून शिर्के सरदेशमुख ऐसें खरें जालें. तो मुतालीक दूर करून सरदेशमुखीचें वतन गणोजीराव व रामोजीराव शिर्के यांशीं करार देऊन तानाजीराव वडील भाऊ त्याचे कान्होजी त्याचे रामोजी यास्तव त्यांचें नांव आधी लेहून पिलाजीराव धाकटे भाऊ त्याचे पुत्र गणोजीराव ह्मणून त्याचें नांव मागून लेहून राजपत्रें करून दिल्हीं. त्या उपरी राजश्री स्वामी देशास आले. समागम रामोजी शिर्के पत्रें घेऊन आले. त्यांणीं नवीन ताकीदपत्रें मागितली. त्यांत गैर वाका समजावून आपले एकाचेंच नांवें पत्रें घेऊन वतनाचा अनुभव करू लागले. आपला विभाग द्यावयाशी कथळा करितात. येविषयीं मनास आणून पारपत्य केलें पाहिजे ह्मणून त्याजवरून विठोजी व दौलतराव व कान्होजी व बहिर्जी शिर्के यांशीं हुजूर आणून जामीन देऊन मनसुबीस उभे राहणें, निवाडा होईल त्याप्रणें वर्तणूक करणें ह्मणून आज्ञा केली. त्यास तुह्मी राजीनामा द्यावयाशी सिध्द जाले ते चौघेजण राजीनामा न देतां नसतें कथळे करूं लागले. यास्तव, त्यास सदरेवरून उठविलें, आणि सभासद, हुजूरचे सरकारकून व शंकराजी मल्हार पूर्वी चंदीस होते ते मोंगलाईंतून स्वामीसंनिध आले त्यांस, व राजश्री खंडेराव दाभाडे सेनापती व मानसिंग मोरे व सुलतानजी रावजी निंबाळकर व वरकड भले लोक यांशीं करीना पुशिला. त्यांनीं चंदीचे प्रसंगीं गणोजीराव शिर्के यांनी स्वामीसेवा करून कार्यास आले.