Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)

ऐसे सभानायकांनीं विचार करून हेहि गोष्टीस वतन पश्विमवादी यास साधत नाहीं ऐसे समस्त गोत नायकांचे मत जाहले. शिदोजी बहिरोजी देशमुख खरा. शिदोजी बहिराटजी पश्विमवादी यास वतनास तालुका नाहीं हा सिध्दांत जाला. मग राजश्री पंत प्रतिनिधी यांनी निकाल काढिला कीं हे वतनाची गोष्टी आहे, याचा निवाडा राजश्री स्वामीच्या विद्यमाने करावा. ह्मणून राजश्री स्वामीपाशी सातारियाच्या मुक्कामी येऊन विनंति केली कीं साहेबी यास कायते विल्हे लाविले पाहिजे. त्याजवर महाराज राजश्री स्वामी यांनी सभेस बैसोन गोत मिळवून गोतनायकास आज्ञा केली की अग्रवादी शिदोजी बिन बहिरोजी, पश्विमवादी शिदोजी बिन बहिराटजी यांच्या तकरिरा मनास आणणें. तकरिरा घेऊन पहिले गोतांनीं व पाटलांनी कयास केला हे मनास आणून विचार केला कीं राजसभा ह्मणजे इंद्रसभा, धर्मपरायण, सिध्दिप्रमाण, मर्यादा रक्षणार, यांनी उभयतांच्या तकरिरा मनास आणून पूर्वी प्रतिनिधी यांचे विद्यमानें शिदोजी बिन बहिरोजी ज्याप्रमाणें खरा केला त्याप्रमाणें हल्ली इनसाफ जाहले. त्यावर राजश्री प्रतिनिधींनी महाराज राजश्री स्वामीस विनंती केली की यदर्थी साक्षी कर्यात म॥रचे पाटलांनी श्रीत दिल्ही ह्मणून सदहर्हू प्रमाणे तपशीलवार साक्ष विदित केली. एकूण प्रतिनिधीच्या विद्यमानें शिदोजी बहिरोजी अग्रवादी खरा, परंतु महाराज साहेबमजालसीं यास विचारलें की इनसाफ तो कलोन न गेला परंतु पांच पिढीया शिदोजी बहिराटजी वतन खात आला. याचा वतनास कलंक लागला. जैसा चंद्रास कलंक तैसे जाहले. एक तरी पोसणा घेतला होता. दुसरी गोष्ट भोगवटाही जाहला याकरितां निमसोड मायणी कर्यात गांव ४० चाळीस त्यापैकी मायणी तर्फ गाव ८ आठ दरोबस घ्यावे. उरले निमसोड कर्यात गांव ३२ बत्तीस शिदोजी बहिरोजी अग्रवादी यास द्यावे आणि गर्गशा तोडून टाकावा ह्मणून विचारिले. मजालशी यांनी उत्तर दिल्हें की महाराज साहेब ह्मणजे हिंदुपती बादशाही ईश्वराचें आधी ध्यान आहेत. जे इनसाफ कराल त्यांत कुसूर ठेवू नये ह्मणजे चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत कीर्त राहील. उभयतांची सजाविशी निकाल साहेबी काढिला येणेंकरून हारदुजणाचा गर्गशा तुटला. हे गोष्टी आह्मा गोतास मानिली. मग सदर्हूप्रमाणें हासदुजणास सांगितलें की शिदोजी बहिरोजी अग्रवादी यानें कर्यात निमसोड गांव ३२ बत्तीस रक्कम जमीन चावर ४०० चारशे याचे देशमुखीचें वतन अनुभवून असावे. शिदोजी बहिराटजी पश्विमवादी यांणी मायणी कर्यात गांव ८ आठ एकूण रकम जमीन चावर २०० दोनशे येथील देशमुखी वतन अनुभऊन असावे. ह्मणून समजावीस केली.