Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)

[१३६]                                                                    श्रीजगद्गुरूप्रसन्न.                                                     ११ जून १७५१.  

राजश्री दिनकर महादेव गोसावी यांसी :-
सु॥ इसने खमसैन मया व अलफ. रा. गणेश बल्लाळ आज मंगळवारी प्रविष्ट जाहले. त्यांनी वर्तमान सांगितलें. तेथें भावार्थ कीं, गुजराथ निम्मे व सिहीगड मात्र करार कर्नाटक न द्यावें, कारभार राजश्रीनीं खातरेस येईल ते करावे. ऐशीयास, राजश्रीस अटकाव गडावर जाहाला, यासाठी इतके दिवस भांडलों, ज्यांनी अटकाव केला त्याचे दावेदार जालों. सर्व मातब्बरांचा डौल एकीकडे. एक आमचा त्र निश्चय की भांडून अथवा सलूखाने राजा सुटावा, ज्याचे चाकर ह्मणविलें त्यासाठी मेहनत करावी, मग तो बूज करून कृपा करील तेच विशेष. याअर्थे लाखो रुपये खाऊन आपले मनसबे बुडवून, राजा सुटावा या थरास आणिलें सर्व बाईसाहेबांचे पक्षी मिळाले होते. एक आह्मी मात्र राजश्रीचे पक्षीचे जाणून आमचे पारिपत्यास सर्व राज्यांतील सरदार प्रेरिले. गायकवाड तो सर्व देश लुटीत सातारियासच आला, याजमुळे भागानगर व कर्नाटक प्रांतीचीं कामें अफ्तर जाहालीं. इतके पदार्थ राजश्रीचे सुटकेचे उपयोगास लागलों यास्तव प्राप्त जाहालें. आता गडावर सर्वाध्यक्षता राजश्रींची जाहालियाउपर आमचे मनोरथ बाकी राहिले नाहीत. मतलबाचे यादीवर करार त्यांनी संतोषेंकरून देणें उचित. यद्यपि न दिल्हे तरी आह्मी त्यासाठीं अडवावें असें नाहीं. जेव्हा खाली येतील तेव्हां सर्व सेवकांच्या रीतीं व आमचे स्थितीची तुळणा करितील. तेव्हां जे त्यांचे खावंदगिरीस व कदरदानीस उचित तेंच करितील. राजास वर बसविलें होतें यास्तव आह्मीं किल्ल्याशी भांडत होतों. आतां राजाचा यख्तियार परिच्छिन्न जाहाला असिला तरी एके दिवसांत आमची फौज उठोन येईल. आपलें पदरचें खाऊन बसावयाचे प्रयोजन काय? परंतु सांगोल्याहून राजे गेले ते समयीं चिरंजीव नाना व चिरंजीव भाऊंनी अर्ज राजश्रीस केला होता की गडावर न जावें. परंतु आमचा अविश्वास यामुळे गेले. शेवटीं कर्मभोग अपकीर्ती येथपावेतों जाहाली आतां राजे वर राहिले, आमचे फौजेस उठवून लाविले, तरी मागती अनेक कल्पना व्हावयास अंतर होणार नाहीं. करवीरकरांकडील वगैरे पेंच बहुत आहेत. खावंद लोकांनी व जे हालीं तेथें मंत्र सांगणार असतील त्यांसी दीर्घ विचारून जे करणें ते करावें. सर्वोत्तम पक्ष हाच कीं तिळमात्र संशय न धरता राजश्रींनीं खाली यावें. दिल्ली, इरान, तुरानापासून रामेश्वरापावेतों दुर्लौकिक जाहाला आहे तो दूर करावा. कारभाराचा अर्थ जर जोरावादीने आजपर्यंत कोठेहि कारभार शेवटास गेले नाहीत. सर्व योग खावंदाची रजावंदी राखावी, हेच आमची इच्छा. खावंदांनी आपले आवडीने कारभार घेतील तेव्हांच करूं. कारभार करितां बहुतांचा दावा पदरीं पडतो तो कारभार कशास पाहिजे ? खावंदांनी दिल्हे दौलतींत कारभार बहुत आहेत. नवा तोतया लबाडी करील यास्तव ठेविला, त्यास जिवें न मारावें, वरकड खातरेस येईल तेथे ठेवावा. आमचा गुंता तिळमात्र नाहीं. खावंदांनीं सुखरूप राज्य करावें. याप्रकारें बोलोन हवालदारास समजोन सांगोन खाली प्रतिपदेस येत तें करणें. वेरझारेवर काम पडल्यास अनेक विघ्ने उपस्थित होतात. यास्तव रंग भरून त्यांची निशा करून खाली येत, आह्मी श्रम केलियाचें सार्थक होय, तें करणें. छ २७ रजब, मंगळवार, संध्याकाळ.