Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)

येणेप्रमाणे जन पहिले दिल्हे तेच करार करून हालीं तकरिरा लेहून मागीतल्या.
येणेंप्रमाणें तकरिरा हारदू जणांनीं लेहून दिल्हे.

तपशील. 
अग्रवादी संताजी व सिदाजी बिन
बहिरजी घारगे देशमुख क॥
निमसोड लेहून दिल्ही तकरिरा
ऐसीजे, सिदोजी बिन बहिराटजी
घारगे यामध्यें व आपणामध्ये प्रांत
मजकूरचे देशमुखीचा कजिया आहे
याकरितां आपण हुजूर येऊन उभे
राहिलों की आपले वंशपरंपरेनें
भोगवटा करीत आलों आहों,
वडिलांनी भोगवटा करीत आहों,
ऐसें असतां हें बळेच खाताती.
शिकी याचे मालक खावंद आपण
आहों; आपले वडिलांनी देशमुखीचा
भोगवटा केला आहे. बितपशील. मूळ
पुरुष बाळजी नाईक घारगे देशमुख,
त्याचे लेक बाबाजी नाईक, त्यांचे लेक
फिरंगोजी नाईक, त्याचे लेक काळोजी
नाईक देशमुख, त्याचे लेक दोघे वडिल
मुधोजी नाईक देशमुख, हरजी नाईक
देशमुख धाकटे, हे वतनांचा कारभार करीत
होते. कसबे निमसोंडात राहून प्रांत मजकूर
येथील देशमुखीचा कारभार मुधोजी नाईक
करीत होते. त्याजउपरी त्याचे पुत्र सूर्याजी
नाईक देशमुखी करीत होते. त्यास काळानुरूप
सूर्याजी नाईक देशमुख यास देवआज्ञा जाहली.
त्याचे लेक सिदोजी घारगे देशमुख हे लहान तीन
महिनियाचे होते.
 पश्विमवादी सिदोजी बिन बहिराटजी
घारगे देशमुख यतिमायणी याणी लेहून
दिल्ही तकरिर ऐशीजे, आपले बाप
बहिराटजी घारगे, त्याचा बाप सूर्याजी
घारगे, त्याचा बाप बहिराटजी घारगे,
त्याचा बाप चंदजी देशमुख, सदर्हू पांच
डोया सदर्हू देशमुखी व शिका क॥
निमसोड मायणी करीत आले. चंदजी
घारगे देशमुखी करीत होते ते मृत्यु पावले.
त्याचे पुत्र बहिराटजी घारगे देशमुखी
करीत होते. विजापुरी पादशाही होती
इनाम तिजाई वहा-