Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)

निमसोडास शिदोजी देसाई याच्या घरास पाठविला नाहीं. दोघे वडील लेक बहिराटजीचे आंबरखानाजवळ चाकरीस ठेविले. त्यास आंबरखान बरोबर घेऊन माहालीं नायब ठेऊन आपण खडकी अवरंगाबादेस गेले. त्याजबरोबर दोघे भाऊ जात होते. ते पळाले. दूर कसेंहि जावे ह्मणून बगर रजा पळोन आले. मागें खजाना आंबरखानाचा येत होता तो लुटला. वाटेस दगा जाहाला. ह्मणून खानानें माहाली नायबास लेहून पाठविलें कीं बहिराटजीचे लेक पळाले, त्यांनी वाटेस खजना लुटला, तरी बहिराटजीस कैद करून ठेवणें. त्याजवरून दिवाणानें बहिराटजीस कैद करून मार देऊन गुन्हेगारी व्होन पादशाही चार हजार खंड बैसविला, द्यावयास ताकथ नाहीं. मग शिदोजी देसाई याजपाशीं येऊन बजिद जाहला कीं मी तुझा चाकर आहें, आपणावर बला आली, आपण मरतों, तरी हल्लीं कुमक करणें. ह्मणून निमसोडास येऊन शिदोजी देसाई यास सांगितलें. मग शिदोजी देसाई यांनीं गांवगन्नाचे पाटील मिळवून दुसाक हक्क पदर पसरून मागून घेऊन चार हजार व्होनाची पट्टी करून दिली आणि आपला चाकर सोडविला. याखेरीज कांहीं नागवण पडली नाहीं. अगर आमचे गुजरातीनें कधी तकसील देशमुखीची लेहून दिल्ही नाहीं. येणेप्रमाणें करिणा देशमुखीचा आपले वडिल वडिल सांगत आले आहेत. हें लेहून दिल्ही साक्ष समस्तांनीं सही, येणेप्रमाणें गोताच्या जाहल्या. त्याजवर सभासद गोतनायकांनी सिध्दांत केला की पूर्वी तकरिरावरून इनसाफ पाहोंत. शिदोजी बहिरोजी खराच जहाला. शिदोजी बहिराटजी पश्विमवादी याचे वडील चंदजी बहिराटजी मुतालिकीच करीत होते हे खरे. सूर्याजी त्याचा लेक पोष्या घेतला. यामुळे देशमुखी करू लागला. परंतु चंदजीचा लेक बहिराटजी याचे वैरियाचा वंश ह्मणून देशमुखी करूं लागला. शिदोजी देसाई यानें पोशीक घेतला मात्र. परंतु याचे घरी राहून याचा लेक ह्मणून देशमुखी करावी ते केली नाही. जबरदस्तीमुळें देशमुखी करू लागला. परंतु देशमुखीचा मलक नव्हे. मुतालिकीचे देशीचा वतनस तालोखा नाहीं. ऐसें मजालसीचे मते जाहले. गोहिमुळें ही तालुका नाहीं ऐसे जाहले. अग्रवादी याचे वडिलाचे कागद लेहून घेतला ह्मणोन पश्विमवादी याने तकरीर केली. व गोही गुदरल्यावर आशंका घेतली कीं कागद आहेत ते पाहणें. त्याजवर राजश्री पंतप्रतिनिधी यांनी कतबा लेहून घेतला कीं कागद दाखविणें. त्यास तो बोलिला कीं चौकामाचे कागद आहेत ते घेऊन हाजर करितों त्यास कागद गोतास दाखविले नाहींत. तेव्हां गोतानें चर्चा केली कीं कागद असतां तरी दाखवितां. यद्यपी असला तरी तकलुबी असेल. सभेस कशास काढावा. ऐसा अर्थ पाहून कागद दाखविले नाहीत. पश्विमवादी साधक खळवादी नसती आशंका घेतो. तरी ते कागद प्रसंगास दाखवून शानिशा जाली नाहीं. तेव्हां झुटबाता असतील. ऐसे गोतमते जाहले. हक्क चौथाई व इनाम तीजाईचा खंड पडला. ह्मणून पश्विमवादी यांनी तकरीर केली. त्यास पहिले गोताचें मतें जाले कीं इदलशाई दिवाणांत हक्क चौथाई व इनामतीजाईच नव्हती व गोताचेही साक्षीनें जाले कीं इनाम इनामतीजाई व हक्क चौथाई पडली नाहीं. हारामखोरीचाही खंड पडला तो शिदोजी देसाई यांनी पाटलास पदर पसरून दुसाक हक्क भरीस घालून खंड वारिला. परंतु पश्वमवादी यास पडो दिल्हा नाहीं. यामुळे गोतमतें जाहले कीं पेशमवादी यास वतनास संबंध नाहीं व खस्त जाहली ह्मणून तकरिर केली. त्यास खस्त जबरदस्तीमुळें बईद जाहली. देशमुखीमुळें कांही जाहले नाहीं.