Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
येणेंप्रणे गोहिदार समस्त मिळोन व क॥ मायणी बाळुतेव नाइकवडी याणी साक्ष दिली कीं सिदोजी बिन बहिरोजी घारगे अग्रवादी व सिदोजी बिन बहिराटजी घारगे पश्चिमवादी या दोघांत कर्यात मजकुरचे देशमुखीचा लथळा लागला ह्मणून तमाम गांवगन्ना कर्यात म॥ रचे मोकदम बोलावून विचारलें कीं उभयतांचा लथळा कैसा वाढला आहे तो आपले बेताळीस स्मरोन सत्ये न्यायें सांगणें. ह्मणून श्रीचा बेल माथा ठेविला. तरी शिदोजी बिन बहिरोजी घारगे अग्रवादी व सिदोजी बहिरोजीचा बाप सिदोजी व सिदोजीचा बाप सूर्याजी मयत झाले. त्याची बाईल बुवाईअवा तिचा लेक लहान होता. ते वेळेस आबरखान दिवाण होते. त्याने बायकोस बोलावून सांगितले कीं तुझा दादला मरोन गेला. तुझा लेक लहान दिवाण चाकरीस आपला कारभारी ठेऊन देणें. त्यास तिनें विचार मनास आणून चंदजी घारगा मौजे विखळे यास चाकरीस ठेवून मुतालकीचें काम सांगून कारभास दिल्हा त्याची हकीकत तरी, बुबाईआवाचा दादला सूर्याजी देसाई, त्याचे वडील-वडील नीमसोड मायणीची देशमुखी खात आले सूर्याजी देसाई यांचे बदे दोघेजण करोजी व चापजी हे दोघे अवक्रियेस येऊन सूर्याजी देशमुख रात्री वडगावांत जिवे मारिलें त्या दिवसापासून हारामखोरी करून गेले ते आज तागाईत गेले. सूर्याजी देसाई मेल्यामुळें शिदोजी नेणता, त्याचा मोडता काळ आला. दर्याजी नायकवाडी हाळीं होता. तो बोलावला. त्यानेंच दिवाणांत सांगोन बुबाईआवास बोलावून मुतालीक विखळेकर चंदजी आणून ठेविला. चंदजीने बाजारची वाट कितेका दिवसांनी मारिली, हारामखोरी केली. ह्मणून त्यास दिवाणानें जिवें मारिलें. त्यावर दहा पांच वर्षे देशमुखीचा कारभार बुबाईआवाच करीत होती. चंदजी विखळेकर मारिला, त्यास पुत्र दोघे, एक बहिराटजी, दुसरा वणगोजी होता. पोरवडा जहाला. कितेका दिवसांनीं त्याचे सोयरे कडेगांवकर पाटील यांनी बहिराटजीस आणून बुबाईआवास व शिदोजी देसाई यास भेटविला. ह्मणो लागले कीं, यास अन्नास लावणे. त्याजवरून त्यांनी चाकरीस ठेविला. त्यास कर्यात मायणी तर्फेस आठ गांवींचे देशमुखीचे मुतालकीचा शिक्का देऊन मुतालकीस ठेविला. शिदोजी देसाई कैफी, हमेशा धुंद, निमसोडांत राहिला. त्याच्या पोटी संतान नाहीं. तिही बायका होत्या परंतु संतान जाहलें नाहीं. मग बहिराटजी विखळंकर यास पुत्र तिघे होते. त्यांतून धाकटा पुत्र सूर्याजी शिदोजी यांनी पोष्या घेतला. त्याजवर शिदोजी देसाई यांनीं चवथी बायको केली. त्यास चवघे लेक जाहले. ते वेळेस आंबरखान दिवाण होते. बहिराटजी मुतालिकी आठगांवची करीत असतां कारभाराचा फैलाव बराच केला. त्यास त्याचे खुद्द लेक दोघे, तिसरा पोष्या शिदोजी देसाई यास दिल्हा, ऐसे तिघेजण आंबरखानास नेऊन भेटविले. आंबरखान नेकजाद वली होता. त्यास सांगितलें कीं पोष्या लेक सूर्याजी दिल्हा तो दरबारिया आहे, उपयोगाचा होईल. ऐसें बहिराटजीस सांगितलें. त्याजवरून बहिरटजीनें सूर्याजी तिसरा लेक शिदोजी देसाई यास दिला होता तो अविद्या मनांत आणून आपले घरी नेऊन मायणीस ठेविला.