Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
मराठ्यांच्या हातांत सत्ता आली ती कांहीं सुखानें आली नाहीं; ती येण्यास फार त्रास सोसावा लागला. बादशहानें सनदा दिया ख-या, परंतु बादशहाच्या हुकुमाप्रमाणें करण्यास त्याच्या सुभेदारास भाग पाडणें, इतकें सोपें नव्हतें. सय्यद बंधूस अधिकारावरून काढून टाकल्यानंतर निजामउल्मुलुक हा दक्षिणचा सुभेदार झाला. बादशहानें केवळ निरुपाय ह्मणून ज्या सवलती मराठ्यांना दिल्या, त्या निजामास पसंत नव्हत्या. सबब वीस वर्षेपर्यंत निजामाशीं मराठ्यांना एकसारखें झगडावें लागलें. या लढाईत दुसरा पेशवा बाजीराव, बाळाजी विश्वनाथाचा मुलगा, हा फार प्रसिद्धीस आला. अखेरीस बादशहानें दिलेल्या सनदा आपणांस मान्य आहेत असें निजामानें कबूल केलें. पण सय्यद बंधू अधिकारभ्रष्ट झाल्यानंतर निजामानें कोल्हापूरच्या राजास आपला आश्रय दिला. त्याच्या बाजूचे आपण, असा तो बाणा बाळगूं लागला, व शाहूनें चौथाई व सरदेशमुखीबद्दल वसूल गोळा करण्यास अधिकारी पाठविले, तेव्हां कोल्हापूरच्या राजाचेही तेच हक्क आहेत, अशी निजामानें तक्रार केली. बाजीरावानें हा तंटा मिटविला व नवीन ‘फरमन’ करून घेतली. पुढें कांहीं काळानें निजामानें दुसरेंच भांडण उपस्थित केलें. महाराष्ट्रांत शांतता राखणें हें शाहूचें कर्तव्य होतें, "ते त्यानें बजाविलें नाहीं; तेव्हां चौथाई व सरदेशमुखीचा हक्कही शाहूस नाहीं असें निजाम ह्मणूं लागला. अर्थातच देघांमध्यें तंटा उत्पन्न झाला, व हा गधला कांटा काढून टाकण्यास दपटशहा देणें भाग पडलें. शेवटीं दोघांच्या सोईप्रमाणें कांहीं मुलखानी अदलाबदल करून व हैदराबादच्या अगदीं लगतच्या मुलखांत चौथाई व सरदेशमुखी घेणार नाहीं इतकी सवलत त्यास देऊन, बादशहानें दिलेल्या देणग्या रास्त व मान्य आहेत असें बाजीरावानें निजामास कबूल करावयास लाविलें. इ० स० १७३० च्या सुमारास कोल्हापूरच्या राजाशीं संगनमत करून निजामानें पुनः भांडण काढलें. चौथाई व सरदेशमुखी या हक्कांत आपला एक हिस्सा आहे अशी सबब पुढें आणली. परंतु पेशव्याच्या अजब युक्तीमुळें निजामास यश न मिळून त्याचा सर्व बेत फसला, व कोल्हापूरच्या राजास जी मदत तो देई ती त्याला बंद करणें भाग पडलें. शाहूचा सेनापति, प्रतिनिधि यानें खुद्द कोल्हापूर राजांचा पराभव केला. नंतर कोल्हापूर व सातारा येथील दोन राजाचा तह झाला. या तहांत असें ठरलें की, चौथाई, सरदेशमुखी, व स्वराज्य या बादशाही देणग्यांत कोणाचा हिस्सा नसून त्या शाहूनेंच उपभोगावयाच्या व कोल्हापूरच्या राजानें वारणेच्या दक्षिणेस तुंगभद्रेपर्येत जो मुलूख आहे तेवढा घेऊन संतुष्ट राहणेचें. याप्रमाणें तीन लढाया होऊन व दोनदा मंजुरी मिळून इ. स. १७३२ च्या सुमारास या बादशाही देणग्यास कायद्याचें रूप प्राप्त झालें व आतां मात्र सर्व लोकांस ते कायदा पाळावा लागला. इतकें झालें तरी तंट्याचीं कारणें समूळ नाहींशी झालीं नाहींत, पण यानंतर निजाम व मराठे सरदार यांच्यामध्यें ज्या लढाया झाल्या. त्यांत बादशहानें दिलेले हक्क कायदेशीर आहेत किंवा नाहींत हा प्रश्न नव्हता. इ. स. १७५३त मराठे व त्यावेळचा निजाम सलाबतजंग ह्या दोघांची लढाई होऊन निजामाचा पराभव झाला, व तह होऊन खानदेश आणि नाशीक ह्या प्रांतांतील सर्व मुलूख मराठ्यांच्या राज्यांत सामील झाला. इ. स. १७६०त पुनः लढाई होऊन मराठ्यांच्या सैन्यासच जय' मिळाला. आणि अहमदनगराकडील मुलूख व अहमदनगरचा किल्ला पेशव्यांच्या मुलखास जोडण्यांत आला. इ. स. १७९० च्या सुमारास असेच तंटे होऊन सोलापूर व विजापूर या प्रांतांपैकीं पुष्कळ भाग खालसा होऊन पेशव्यांच्या राज्यास जोडला गेला. कर्नाटकांत मराठ्याची लढाई निजामाशीं नव्हे, तर सावनूरच्या नावाबाशीं चालूं झाली वे बाजीराव पेशवे व त्यांचे चिरंजीव बाळाजी बाजीराव यांनी तीन लढाया मारून विजापूर, बेळगांव व धारवाड हे प्रांत मराठीराज्यास जोडिले. सावनूरच्या नावाबाची सत्ता नाहींशी झाल्यावर हैदर व टिप्पू हे म्हैसूर प्रांतांत इ. स. १७६० ते १७९० पावेतों फार बलाढ्य झाले होते, व त्यांच्याशींच कर्नाटकांतील लढाया चालवाव्या लागल्या. ह्या लढायांनीं म्हैसूरकरांचा मोड झाला व मराठ्यांचें राज्य तुंगभद्रेपर्येत वाढलें. ह्याचप्रमाणें बाजीराव पेशव्याचा भाऊ चिमणाजीआप्पा व तिसरा पेशवा बाळाजी बाजीराव यांनीं पोर्तुगीज लोकांबरोबर व जंजि-याच्या शिद्दीबरोबर लढाई करून तींत जय मिळविला. याप्रमाणें एका शतकाच्या अवधींत जवळजवळ सर्व महाराष्ट्र देश इतक्या निरनिराळ्या उपायांनीं मराठा मंडळाच्या हातांत आला. हा राज्याचा विस्तार लढाईमुळें झाला हें खरें; तरी त्याचें मूळ कारण चौथाई व सरदेंशमुखी देणग्यांनीं प्राप्त झालेले हक्क, हेंच दोय. हा विस्तार झाल्यामुळे “ स्वराज्य " या नांवाखालीं आतां फारच मोठा मुलूख मोडूं लागला. चौथाई व सरदेशमुखी वसूल करण्याचा हक्क सनदेंत लिहिल्याप्रमाणें पूर्वी तापी नदीच्या दक्षिणेस जे सहा सुभे आहेत त्यांवरच फक्त होता. परंतु पुढें वीस वर्षांनंतर सर्व बादशाही साम्राच्यावर तो हक्क लागू झाला. ह्मणने यांत उत्तरेकडील सर्व मुलूख-गुजराथ, काठेवाड, माळवा, राजपुताना, बुंदेलखंड, दुआब, निमच, गोंडवण, संबळपूर, ओरिसा, आग्रादिल्ली, अयोध्या आणि बंगाल यांचासुद्धां समावेश होतो. हा राज्यविस्तार व अधिकारविस्तार याविषयीं आह्मीं पुढील एका भागांत लिहिणार आहोंत, परंतु त्याचें ठोकळ स्वरूप वर लिहिल्याप्रमाणेंच आहे. गेल्या शतकांत ज्याप्रमाणें पैका घेऊन सैन्य पुरविण्याचें, करून व लढाया मारून ब्रिटिश सरकारनें आपला अधिकार वाढवून त्यास कायदेशीरपणा आणला, त्याप्रमाणें मराठ्यांना चौथाई व सरशमुखी हे हक्क मिळाल्यामुळें त्यांची सत्ता वाढून ती कायदेशीर झाली. मराठा सरदारानीं हे ने जय मिळविले ते एकएकटेराहून नव्हे, तर सर्वांची जूट झाल्यामुळें ते मिळाले, यांतच या राज्यविस्ताराच्या इतिहासाचें महत्व आहे. यावरून अलग राहिल्यापासून काय परिणाम होतो हें चांगलें कळून येतें. कोल्हापूर व तंजावर येथील राजे एकलकोंडे राहिले ह्मणून, ज्याप्रमाणें चौथाई व सरदेशमुखी हक्क प्राप्त होऊन - पेशवे, गायकवाड, शिंदे, होळकर, भोंसले, विंचूरकर, बुंदेले, पटवर्धन, व इतर मराठे सरदार महत्वाचीं कामें बजावून प्रसिद्धीस आले, तसे वरील दोन राजांना येतां आलें नाहीं. बाजीराव पेशव्याचें राज्यविस्ताराचें धोरण अमलांत आणावें, की प्रतिनिधि यांचे सल्याप्रमाणें आहे तेंच रक्षण करून बसावें, या प्रश्नासंबंधानें एका मोठ्या प्रसंगी शाहूच्या मंत्रिमंडळांत बराच वादविवाद झाला. पेशव्यांच्या वक्तृत्वानें शाहूच्या अंगांत स्फुरण येऊन त्यानें, जुटीनें पाऊल पुढें टाकण्याचें धोरण आपणास संमत आहे असें सांगितलें. ह्या जुटीपासून कोणकोणतीं महत्कृत्यें साधलीं हें इतिहासांत महशूर आहेच. उलटपक्षीं अलग राहिल्यापासून नेहमीं नुकसान होतें हें दक्षिण हिंदुस्थानामध्यें मराठ्यांनीं प्रथम जिंकलेल्या मुलुखांच्या स्थितीवरून चांगलें व्यक्त होतें. ह्मणून जुटीमुळें झालेला वरील मराठी राज्याचा विस्तार, व अलग राहिल्यामुळें तंजावरच्या गादीवर बसलेल्या शिवाजीच्या भावाच्या वंशजांची झालेली क्षुद्र स्थिति, या दोहोंतील अंतर पुढील भागांत दाखविण्याचें आह्मीं योजिलें आहे.