Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
पवार, चवाण, थोरात व आठवले यांनी या अडपझडप लहान मोठ्या चालवलेल्या युद्धांत पुष्कळ जय मिळविल्यामुळें जिंजी येथील दरबाराकडून त्यांचा पुष्कळ मान झाला. इ. सन १६९३ त औरंगजेबास भीमा नदीवर आपल्या छावणाना तळ देणें अवश्य वाटल्यावरून त्यानें तिकडे मोर्चा फिरविला व आपल्या पुत्रास व मुख्य प्रधान असुदखान यांस जिंजीवर पाठविले
इ. सन १६९४ सालीं संताजी घोरपडे याचे हाताखालीं, मराठ्यांनीं औरंगजेबाच्या छावणीच्या उत्तरेकडील मुलूख लुटला, व रामचंद्रपंतांनीं पश्चिमेस सोलापुरापर्यंत लढाई चालविली. इ. सन १६९५ त परसोजी भोंसले व हैबतराव निंबाळकर यांना, दिल्लीहून येणा-या बादशहाच्या पलटणींना त्रास देत रहावें ह्मणून व-हाड व गंगथडी या प्रांतांतच सोडून संताजीनें आपण स्वतः कर्नाटकापर्यंत चाल करून वेढा घातलेल्या लोकांवर हल्ला केला आणि त्यांस पिटाळून लाविलें, व धनाजीनें एका बाजूनें छापा घालून त्यांचा पक्काच पराभव करून टाकला. अशा रीतीनें, धनाजीनें संभाजीस मदत केली. याप्रमाणें वेढा घालणारे लोक पुरतेपणीं लाचार होऊन, बादशहाचा कारभारी व संताजी यांच्यामध्यें तह झाला. या तहाच्यायोगानें कांहीं अटीवर मोंगलाच्या सैन्यास परत जाऊं दिलें. परंतु औरंगजेबासे हें आपल्या कारभा-यानचें करणें पसंत न पडून त्यानें आपल्या मुलास परत बोलाविलें व झुलपिकारखानास त्याच्या हाताखालीं दुसरें सैन्य देऊन लढाईवर पाठविलें. त्यानें तरी वेढ्याचें काम ताबडतोब सुरू केलें नाहीं. इतक्यांत संताजी तूर्त काळजींतून मुक्त झाला व विजापुराजवळ बादशहाच्या छावणीच्या आसपास फिरता राहून त्यानें दोडेरीजवळ काशीमखानाचा मोड केला.
हिम्मतखान नामक दुसरा एक सरदार असाच फशीं पडून त्याचा पराभव झाला. शेवटीं इ. स. १६९७ त वेढ्याचें काम जास्त नेटानें चालून, वर सांगितल्याप्रमाणें राजाराम तेथून पळून गेल्यावर ते किल्ला इ. स. १६९८ त मोंगलांनीं घेतला. पुढें लवकरच राजाराम साता-यास जाऊन रामचंद्रपंतास मिळाला, व परसू भोंसले, हैबतराव निंबाळकर, नेमानी शिंदे, आठवले, समशेरबहाद्दर, हे गराठे सरदार आपस्या देशाला परत आले. मराठ्यांच्या ठाण्यांचे रक्षण करण्याकरितां धनाजी जाधव यास दक्षिणेंत ठेविलें होतें, तरी लढाईचें मुख्य ठिकाण कर्नाटक व द्रवीडदेश बदलून महाराष्ट्रच झालें. समुद्रकिना-यावरील जे किल्ले होते त्यांनीं इमान राखून मराठ्यांचा पक्षच उचलला व कानोजी आंग्रे याचे हाताखालीं मराठ्यांनी त्रावणकोरपासून तहत मुंबईपर्यंत लुटालूट चालवून समुद्रांतील पुष्कळ माल पकडून नेला. सावंतांनींही इमान राखिलें.
इ. स. १६९९ मध्यें आपलें सर्व सैन्य घेऊन राजाराम खानदेश, गंगथडी, व-हाड आणि बागलाण या प्रांतांत शिरून त्यानें चौथाई व सरदेशमुखी वसूल केली व साता-यास परत येतेवेळीं, दाभाड्यास बागलाणमध्यें, शिंद्यास खानदेशांत, भोंसल्यास व-हाडांत व निंबाळकर यास गंगथडीमध्यें ठेविलें.