Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
संभाजीचा कलुषा नांवाचा एक प्यारा दोस्त होता. त्याच्या सल्लासंगतीने संभाजीला दारू पिण्याचें व बाहेरख्यालीचें अतोनात व्यसन लागून, ज्यायोगानें त्याचा शारीरिक तसाच मानसिक काटकपणा कमी झाला, भुतेंखेते, समंध, चेटकें इत्यादि वेडगळ कल्पनांचा तो केवळ दास बनून राहिला. संभाजीच्या कारकीर्दीचें सविस्तर वर्णन देण्यापासून कांहीही उपयोग होणें नाही. कारण, त्यानें महाराष्ट्रावर राज्य केलें असें कदापि म्हणता येणार नाहीं. अष्टप्रधान राज्यकारभारांतून वगळल्यासारखेच होते. अर्थात् त्यांच्यावरची जबाबदारीही नाहींशीं झाली. शिवाजीनें केलेली राज्यव्यवस्था व फौजेची व्येवस्था यांकडे दुर्लक्ष झालें. शिपाई लोकांना वेळच्या वेळेस पगार मिळेना. किल्ल्यांत शिबंदीचा व --------तोटा पडला. वसूलाचें काम मक्त्यानें देण्यांत आलें. याप्रम----चोहोंकडे अव्यवस्था झाली, व याच वेळेस औरंगजेब बादशहाची स्वारी सर्व त-हेचें हत्यारबंद असें तीन, लाख सैन्य बरोबर घेऊन दक्षिणेंत उतरली. मनांत इरादा हा कीं, दक्षिण हिंदुस्थानांतील हिंदू व मुसलमान राज्यें पुरती काबीज करून, जन्मभर चालविल्या उद्योगाचें एकदाचे सार्थक्य करावयाचें.. हें धाडसाचें कृत्य करण्याकरितां ..औरंगजेबास, एका बाजूस काबूल, कंदाहारपासून तो तहत दुस-या बाजूस. बंगालपर्यत जितके जास्त लोक व द्रव्य मिळेल तितकें पाहिजेच होतें. व या कामावर त्यानें आपल्या हुषार हिंदु व मुसलमान सरदारांची नेमणूक केली होती. याच सुमारास औरंगजेबाच्या पुत्रांपैकी एकजण संभाजीच्या आश्रयास येऊन राहिला होता. त्याच्या मदतीनें संभाजीस या नवीन उद्भवलेल्या संकटाचा प्रतिबंध करितां आला असता. पण संभाजीनें हीही संधी दवडली. त्याच्या पूर्वीच्या प्रधानमंडळानें, सध्यां ओढवलेलें संकट किती जबरदस्त आहे याची कल्पना संभाजीला यावी, म्हणून खटपट केली, पण तीसुद्धां त्याला आवडेना. औरंगजेबाच्या सैन्याने दक्षिणेंत आल्यापासून अवघ्या तीन वर्षांच्या अवधींतच विजापूर, ' व गोवळकोंडे ही दोन्हीही राज्यें हस्तगत केलीं व संभाजी अगदीं पेचांत सांपडून गरीब गाय झालेला, सहज पकडला जाऊन, शेवटीं अति क्रूरपणानें ठार मारला गेला. सर्व सपाट प्रदेश उध्वस्त होऊन, किल्ले तर एकामागून एक 'लढाई न करताच हस्तगत झाले. याचें मुख्य कारण म्हटलें तर त्यांचा बचाव करण्याकडे झालेलें दुर्लक्ष्य होय अखेरीस रायगडसुद्धां शत्रूचे हस्तगत होऊन, संभाजीची. बायको-- मुलगा यांस औरंगजेबच्या छावणींत नेण्यांत आलें. याप्रमाणें दक्षिणेंत येऊन पुरीं पांच वर्षे व्हावयाच्या आंतच, आजन्म मनांत खळ-- असलेला हा औरंगजेबाचा मनोरथ सिद्धीस गेला. नर्मदेपासून तों तुंगभद्रेपर्यंत सर्व देशे त्याच्या स्वाधीन झाला--जणूं शिवाजी व त्याचे बरोबर यश संपादन केलेले अनेक वीर जन्मास येऊन व्यर्थ ; आले तसे गेले. शहाजी व त्याच्या नंतर शिवानी, यांनी आज साठ वर्षा हून अधिक वर्षे ज्या महापुरापासून अविश्रांत मेहनत करून महाराष्ट्राचें संरक्षण केलें, तो महापूर आतां बांध फुटल्यामुळें सर्व देशभर पसरून, आपल्या मार्गात येतील त्यास आपल्याबरोबर वाहून नेऊं लागला. त्यास प्रतिबंध होण्याचें चिन्हच दिसेना. विजापूरकर व गोवळकोंडेकर दूरदेशीं ( दिल्लींत ) बंदिवास भोगीत राहिले. व संभाजीचा मुलगा अगदी बच्चा असून त्याससुद्धां बादशहानें आपल्या छावणींत राहण्यास नेलें.