Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
व्यंकटपा नाईक सुरापूरकर यास लेखांक २४२. १७१५ वैशाख वद्य १.
पत्र जासुदाबराबर छ १४ सवालीं.
राजश्री राजे व्यंकटपा नाईक बलवंत बहिरीबाहदूर गोसावि यासि-
सकलगुणालंकरण अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्नो गोविंदराव कृष्ण आसीर्वाद विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीये लिहित असावें विशेष तुह्मी पत्र पो तें पावलें नवाब अजमुलउमराबाहादूर यांस थैली-पत्र संस्थानचे नादारीचा प्रकार दर्शऊन पा ते पावतें केले मसविद्यावरून मार समजला जवाब घेऊन मागाहून रवाना होईल नवांबाचे सरकारचा ऐवज आपल्याकडून बहुत. यावयाचा याची सरबराई लौकर जाली पाहिजे येविषी ता यापूर्वी राजश्री वेणू गोपाळ यांजबराबर लिहून पा आहे ऐवज लौकर यावा राजश्री गोविंदआपा यांचे येण्याविसी पुण्याकडे ल्याहावें ह्मणोन लिा त्यास मारनिलेस तेथून निरोप देऊन रवाना केलें ऐसे गोविंदराव यानी लिा होते सुरापुरास येतील इकडूनहि आणिक त्यांचे रवानगीविषई लिहिण्यात येत आहे रा छ १४ सवाल बहुत काय लिा लोभ कीजे हे विनंति.