Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
तिमाराव हरी यास पत्र गोविंद लेखांक २४०. १७१५ वैशाख शुद्ध १५.
बकाल याजकडे पाठविले छ १३ सवाल.
राजश्रिया विराजित राजमान्य राजेश्री तिमाराव हरी स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहीत जावे विशेष खासगी पागा राजश्री गोविंद बकाल यांजबराबर पा आहे तर तेथे आल्यानंतर पागा राहण्याची ठाणी सोय चांगली व चौकी पाहन्याचा बंदोबस्त चांगला करवावा येविषई अजमसाहेब यानीहि पत्र दिल्हे ते पो आहे तर ठाण्याची व कडब्याची सोय चांगली करवावी दाणा खरीपी करतील त्यास सोईचार पडे ऐसी सोय तुह्मी करवावी पागा खासगी जाणून लिा आहे तर लिहिल्याप्रा पागेचा बंदोबस्त दाण्या वैरणीचा व ठाणाचा व्हावा तुमचे भरवसियावर पागेची रवानगी तिकडे केली असे रा छ १३ सवाल बहुत काय लिहिणे. लोभ कीजे हे विनंति.