Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
तिमाराव हरी यांस पत्रे दोन लेखांक २३८. १७१५ वैशाख शुद्ध १३.
अजमसाहेब यांचे व आपले छ १३
सवाल गोविंद बलाले पागे याजकडे
पाठविली अजमसाहेब यांचे.
येखलास दस्तगाह तिमाराव हरी दाम-मोहबतहू -
अजदिल येखलास मिर्जा अजमसाहेब सलाम आंकी लस्कर बेदरास दाखल जाहल्यामुळे इकडील तमाम तालुकचे चारा सरून गेला यास्तव साहेब मेहेरबान गोविंदराव कृष्ण यांजकडील घोडेचे रागाबदल तुह्माकडे मारे करून पाठविले आहे ते सेंभर घोडे व पंचेवीस तीस तटू कांहीं उंट यांस चारा दर महिनेस पनास हजार पुळे सुमार पाहिजे ऐसियास हे दिवस पाऊसपाणीचे आहेत ज्या गांवींचे रागा मारे करून ठेवाल त्या गांवी चाराचा बंदोबस्त व चौकीपाहरांचा बंदोबस्त करून ठेवणे चाराविशई सरकारचा चारा व पागेचा नव्हे फख्त खरीपीस घेऊन चाराचा बंदोबस्त करून देणें हे रुपये तुह्मास मुजर देऊ नाहीं तर नगदी रुपये पाठऊन देऊ कळले पाहिजे ज्यादा काय लिहिणे दिवस पाउसाळा आहे छपरवंदीचा आसरा करून बंदोबस्तीने ठेवणें कळले पो हे किताबत ता छ १२ सवाल.