Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
राजश्री फत्तेसिंगबावा भोंसले लेखांक १७०. १७१५ चैत्र शुद्ध १५.
यांचे पत्राचा जाब रा छ १४
साबान सन १२०२ फसली.
राजश्री फत्तेसिंगबावा भोंसले गोसावि यांसि-
सकलगुणालंकरण अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्नो गोविंदराव कृष्ण आसीर्वाद विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहित असावें विशेष पत्र पा ते पाऊन मजकूर समजला राजश्री नारायणराव पांसरे शाहामतमुलूक याचा भाऊ रा मानसिंगराव पांसरे आवसेकर किलेदार याचा आसरा करून निलंगे परगण्यात धामधूम करितात कांहीं जाबसाल असल्यास येऊन बोलावे ते न करिता मनश्ची वर्तणूक आहे त्यास दोन्ही महाल नवाबाचे खालसा असे असतां अवसेकरानी जागा देऊन खराबी करवितात त्यास नवाब अजमुलउमराबाहादूर यांसी बोलून यांचे पत्र अवसेकर किलेदार यांचे नांवें पाठवावें ह्मणोन विस्तारें लिहिले ते समजलें ऐसियास आपले लिहिल्यान्वयें बाहादूर यांसी मजकूर करून त्याचे पत्र अवसेकर किलेदार मिर्जा उमरखानबेग यांचे नावें पी आहे की मानसिंगराव पांसरे यांस तंबी पोंहचाऊन त्याणी निलंगे परगण्याची गुरें व मवेसी काय आणिली असेल ते जराबजरा त्याजकडोन घेऊन आपली माणसे मारनिलेबराबर देऊन त्यास आंकलकोटास फत्तेसिंग भोंसले याजपासी पावते करून रसीद घेऊन पाठवावी त्यांजकडील कजिया आहे ते समजोन करतील तुह्माकडील पुन्हा बोभाट आलिया कामास येणार नाही ह्मणोन निक्षून ताकीदींत लिहिलें आहे रा छ १४ साबान बहुत काय लिहिणे लोभ असो दीजे हे विनंति.