Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
महमद रोषनखान यास पत्र. लेखांक १७३. १७१५ चैत्र वद्य २.
खांसाहेब मेहरबान दोस्तां महमद-रोषनखां बाहादूर सलामत-
अजदील एखलास गोविंदराव कृष्ण सलाम आं की एथील खैर आफियत जाणून आपली खैर खुषी हमेषा कलमी करावी दिगर मजमून राजश्री मानाजी बळवंतराव देवकांते यांजकडे मोकाशाची ठाणी पा वसमत एथील सेंदूरसणे वगैरे गांव पेशजीपासोन बहुत दिवस आहेत यांचे गांवास आजपर्यंत कोणी इजा दिल्ही नाही होली आपल्याकडून ठाण्याचे गांवास उपद्रव होतो ह्मणोन कळलें त्यावरून लिा असे त्यास यांजकडील गांवास तोसीस लागो नये पेशजीपासोन चालत आल्याप्रा ठाण्याचे गांव यांचे यांजकडे चालत आहेत त्या गांवास उपद्रव लागल्याचा बोभाट न ये ते करावें रा छ १६ साबान ज्यादा काय लिहिणे.