Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
दौलतखान यांस पत्र. लेखांक १७४. १७१५ चैत्र वद्य २.
खांसाहेब मेहरबान दोस्तां महमद-दौलतखांबाहादूर सलामत-
अजदिल येखलास गोविंदराव कृष्ण सलाम आं की एथील खैर आफीयत जाणून आपली खैरखुषी हमेषा कलमी करावी दिगर मजमून पा तामसें एथील मोकासा राजश्री मानाजी बळवंतराव देवकांते यांजकडे आहे त्यास मोकाशाचा अमल फार दिवसापासोन येणे त्याचा फडच्या होत नाही ह्मणोन बोभाट श्रीमंताचे सरकारांत गेला त्यावरून सरकारची पत्रे आह्मास येविषई आली त्यास मोकाशाचा अमल पेशजीपासोन चालत आल्याप्रा ज्या सालापासोन राहिला असेल तेथून सालमारसुधा मारनिलेकडे वाजबी फडच्या करून रसीदा पाठवाव्या बोभाट न ये तें करावें रा छ १६ सोबान ज्यादा काय लिहिणे.