Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
छ १६ साबानी रवानगी-पत्रें लेखांक १७१. १७१५ चैत्र वद्य २.
आनंदराव मोरेश्वर यांचे पत्राचें उत्तर.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री आनंदराव स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून खकीयें लिा जावें विशेष तुह्मी पत्र तें पावलें पागा चाकरीस पाठवण्याचें लिहिलें त्यास पेशजी तुमचे तैनात-पागा पाठवावयाचा इनायतनामा आल्यावरून पागेची सरंजामी करविली रवाना करावी तो हजूर चाकरीस पागा आणविल्या सबब तुह्माकडे येण्याचें तूर्त राहिलें घाटावर मुफसदाचा बखेडा ह्मणोन लिहिलें त्यास येविषई लिहिलें तें नवाब अजमुलउमराबाहादूर यांस ल्याहावें बंदोबस्त करावयाचा तसा करतील तुह्मी पुण्यास गेलां होतां राजश्री पाटीलबावाचे वराती पो पंनास हजार देऊन कबज घेतलें व पंनास देणे आहेत तालुक्यांत तर जीव नाहीं ह्मणोन लिा त्यास तुह्माविषई राजश्री नेमवंत यांसीहि बोलण्यात आलें यांचे ह्मणे कीं वरातेचा ऐवज कोणेहि प्रकारें त्याणी द्यावा त्याजकडे ऐवज फार येणे त्यास तालुक्याची अवस्था सर्वत्र सारखी युक्तिप्रयुक्तीने निर्गम होण्याची तजवीज करावी रा छ १६ साबान बहुत काय लिो लोभ कीजे हे विनंति.