Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
आमचा पुत्र मनोहर व जोतीपताचा पुत्र सखाराम ऐसे येथे कराडास आले मसाला केला होता तो माणसास दिल्हा येथे क्षेत्रस्तानी करार केला की तुह्मी अवघे जण गावास जाऊन गावी समजणे येथे खटला करू नये ऐसे सागितले त्या वरून निघोन त्रिवर्ग गावास आले आह्मास चिरजीव मनोहर याने वर्तमान या प्रमाणे सागितले नतर मध्ये काही येक दिवस गेले मग आणखी आह्मी गावकर याज कडे गेला त्यास आमचा कजिया तोडणे त्यानी सदाशिवबावा यास कितेके प्रकारे सोन्याचा फडशा विभागास असेल तैसा करावा ऐसे सागत होते परतु हे ऐकेनात नित्य याचा आमचा कलह याज मुळे गावात ह्मणो लागले की येथे तुह्मासा सागितल्याने तुह्मी कोणी ऐकत नाही त्या पक्षी थळ नेमून देतो स्थळास जाणे ऐसे बोलणे जाहले ते दिवशी दीडप्रहररात्रपर्यंत उपोषण जाहले तेव्हा गावकर सारे मिळोन स्थळास जावे ऐसे सदाशिवबावा यास व आह्मास सागितले नतर स्थळास राजी होऊन नेमोत्तरे लिहून दिल्ही स्थळ मौजे चिमणगाव हा गाव नेमिला नेमास जावे त्यास सदाशिवबावा स्थलास येईना तेव्हा ते दिवशी आणखी गावकरा कडे गेलो सध्याकालपर्यत उपोषण जाहले तेव्हा सदाशिवबावा यानी गावकरासी करार केला की मी दसरा करून स्थळास जातो व गावकर यानी आह्मास हि सागितले की दसरियात कजिया न करणे दसरा जाहलिया वर स्थळ नेमून दिल्हे आहे तेथे जाऊन फडशा करून घेणे दसरा जाहलिया वर आह्मी स्थळचिटी घेतली आणि सदाशिवबावा यास स्थळास चला ह्यणून बोलिलो परतु आले नाहीत आह्मी स्थळास जाऊन स्थळचिटी दिल्ही स्थळकरी यांनी सदाशिवबावा यास पत्र पाठविले ते मान्य न केले आणि स्थळास आले नाहीत आह्मी स्थळी महिना भर बसलो उपरात स्थळकरी याची चिटी घेऊन गावास आलो गावकरास स्थळचे पत्र दिल्हे तेव्हा पुढे गावी पचाईतात व हकीमात आह्मा उभयताचा कजिया पडला की तुह्मी आह्मा पासोन कर्ज वारविले आणि सोन्याचा फडशा सदाशिवबावा करून देत नाहीत व स्थळास येत नाहीत तेव्हा माझी वाट काय ह्यणोन बैसलो तेव्हा सदाशिव गोसावी यास व कृष्णाजीपत यास बोलाऊन निकड केली सध्याकाल पावे तो आह्मा चौघा जणास बैसविले तेव्हा ते दिवशी सदाशिवबावा बोलले की आपण स्थळास जात नाही तुह्मी चौघे सागाल त्यास मान्य ऐसा करार जाहला मग. आह्मा सर्वत्रास निरोप दिल्हा बाजीपत आषाढमासी मृत्य पावले आह्मी चौघे जण आपलेले घरास गेलो उपरात गावकरा कडे जाऊन फडशा करून घ्यावा ते न करता कुसाजीपत निघोन माहुलीस गेले तेथून पत्र आह्मास पाठविले आह्मी माहुलीस गेलो नाही तेथून कृष्णाजीपत आपले कडे क्षेत्रास येऊन आह्मास पत्र क्षेत्रीचे पाठविले त्या वरून आह्मी क्षेत्रास आलो करीना लेहून देणे ह्मणोन आज्ञा त्यावरून जाहला करीना लेहून दिल्हा असे तरीख छ १८ सु।। सबा समानीन माहे रबिलाखर शके १७०८ पराभवनामसवत्सरे
बिकलम विठल नारायण कुलकर्णी
कसबे कराड