Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

लेखाक २६० बालबोध

श्री
वेदमूर्ती राजेश्री समस्त ब्रह्मवृद व देशमुख व देशपाडे व जोतिषी व कुलकर्णी व राजकीय गृहस्थ मौजे काळे याशि
समस्त ब्राह्मण क्षेत्रकरहाटकस्थ कृत नमस्कार व अनुक्रमे आशिर्वाद विशेष पूर्वी पासून आचारव्यवहारपदप्रायश्चित करण्याचा हा अधिकार क्षेत्राचा पूर्वापार असून त्या प्रमाणे वहिवाट चालत असता पेशजी जगन्नाथपत हासबनीस याज वर काही आरोप आला होता ते समई शिराळकर याणी क्षेत्राची अवज्ञा केली तेव्हा क्षेत्रस्थ मडळी जाऊन शिराळकर याचा कागद लिहून घेतला त्यात हाशील की क्षेत्राचे आज्ञे प्रमाणे वागणूक करू आणि पदप्रायश्चित्त पूर्वी पासून तुह्मी करीत आला त्या प्रमाणे करावे असा आहे नतर मशारनिल्हे हासबनीस याज कडून प्रायश्चित्त करऊन शुद्ध केले असे असून हाली विनाकारण शिराळकर दाडगाई करितात या स्तव ते क्षेत्राचे द्रोही आहेत त्यास शिराळकर व बिळासक ज्योतिषी यासी व याचे घरी अन्नोदकव्यवहार येकपक्ती कोणी करू नये असा निर्बध ठेवावा आणि श्री स्वामी शकराचार्य याचे पत्र शिराळकर यानी आणिले असता मान्य करू नये पत्राचे उत्तर यावे