Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक २६५
१७०८ माघवा। ७
श्री
वेदशास्त्रसपन्न राजश्री समस्त ब्राह्मण क्षेत्रकराड स्वामीचे सेवेसी करीना
बो। सदाशिव बल्लाळ मु।। मौजे कुमटे सा। कोरेगाव प्रा। वाई सु।। सबा
समानीन मया व अलफ कारणे लेहून दिल्हा करीना यैसा जे आमचे चुलते तीर्थस्वरूप माहादेवबावा ब्रह्मच्यारी नैष्टिक त्याचे बधु तीर्थरुप बाळाजीपत आमचे तीर्थरुप त्याचे लग्न बावानी केले पालग्रहण केले त्याचे पोटी पाच पुत्र वडील बाजीपत दुसरे जोतीपत तिसरे भिमाजी गोसावी चवथे कृष्णाजीपत पाचवे कनिष्ट आम्ही ऐसे पाच पुत्र त्याच्या मुजी वृतबध बावानी करविले आणि तिघाची लग्ने बावानी केली उपरातीक बावाचा काळ शके १६७७ युवानामसवत्सरे मार्गशीर्षमासी जाहला त्याचे उत्तरकार्य बाजीपत यानी केले आमचे तीर्थरूप अगोदर च काळ जाहला होता उपरातिक बावाचा काल जाहला आमचे व कृष्णाजीपताचे लग्न बाजीपती केले ऐसे एकत्र असता जोतीपताचा काल जाहला त्याचे पोटी पुत्रसतान नाही बाजीपतास पुत्र येक जोती पताचे नकल जाहले भिमाजी गोसावी यासी पुत्र पाच कृष्णाजीपत पुत्र दोघे व आपणास दोघे पुत्र येणे प्रमाणे चौघाचे पोटी पुत्रसतान जाहले जोतीपताचे नकल जाहले तेव्हा बाजीपत बोलिले जे जोतीपताचे पोटी पुत्र नाही त्याचा काल जाहला तेव्हा त्याचे स्त्रीस येक पुत्र द्यावा तेव्हा तिघा जणाच्या व ब्राह्मणाच्या चित्तात द्यावा ऐसे जाहले तेव्हा बाजीपताचा आग्रह जे तिजला पुत्र द्यावा तिचे चित्तात हि नव्हते घेतला नाही परतु बाजीपतानी घ्यावासा केला भिमाजी गोसावी याणी वृतबध केला तदनतर जोतीपताची स्त्री काशीयात्रेस गेली तेथे तिचा काळ जाहला तिचे उत्तरकार्य तेथे धर्मपुत्र घालून केले येथे कळल्या नतर तिजला पुत्र दिला असता तरी तिचे उत्तरकार्य करून श्राद्धपक्ष जोतीपताचे व त्याचे स्त्रीचे पुत्राने करावे ते न केले बाजीपत करीत आले आणि चौघे बधू येक विचारे येकत्र चालिले गुदस्ता शके १७०७ विश्वावसुनामसवत्सरे पौषशुद्धपौर्णिमेस घरात कलह होऊन विभक्त जाहले तेव्हा पाच विभाग करू लागले तेव्हा कृष्णाजीपत बोलिला जे पाच विभाग का करिता एकाचे नकल जाहले ऐसे असता च्यार विभाग करावे ते पाच विभाग का करिता माझ्या पुत्राचे लग्न जाहले नाही वरकड भावाची पाच च्यार एकएकाची जाली आमचे मुलाचे लग्न नाही तेव्हा विभक्त होता येत नाही ह्मणोन पचाइतास द्वाही दिल्ही असता पाचानी पाच विभाग केले राजी नसता ऐसे असोन चौघाचे ऐकोन आपण व कृष्णाजीपत पाचास मान दिल्हा कर्जवाम व भाडेकुडे व दाणा जबरदस्ती आमचे पदरी घातले परतु घेतले नाही तैसे च पडले आहे ऐसे असोन भिमाजी गोसावी याने व बाजीपंतानी पाच विभाग करून घेतले तुम्ही विभागा प्रा। घेणे ह्मणोन पाचानी सागितले त्या वरून मान्य कृष्णाजीपताचे मुलाचे पाचा जणानी लग्न करून द्यावे ऐसे जाहले असता हाली भिमाजी गोसावी चौघाचे व पचाईताचे मोडून दुसरे च काढले जे माहादेवबावाचा हिसा मजला निमे देणे ह्मणून खटका करून क्षेत्रास आला येणेप्रमाणे जाहले वर्तमान निवेदन केले या खेरीज आपले बोलणे काही राहिले नाही हा करीना लेहून दिल्हा सही छ १९ रबिलाखर माघ वा। ७ शके १७०८