Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक २६२ बाळबोध
श्रीराम
वेदशास्त्रसपन्न राजमान्य राजश्री समस्त ब्राह्मण क्षेत्रकराड या प्रति
स्नेहपूर्वक समस्त ब्राह्मण कसबे चाफळ कृतानेक साष्टाग नमस्कार विनति उपरि येथील कुशल जाणुन स्वकीय लिहित असावे या नतर वो। रा। हरभट आठल्ये याचे घरी काही आरोप आला आहे त्यास येथील ग्रामस्ता पैकी कोणी भोजन न करावे ऐसे ठरावले नतर भटजी मजकूर यास सागावयास गेलो त्यास त्याचे जामात वो। राजश्री यज्ञेश्वरभट ताबे क्षेत्रमाहुली हे येथे आहेत त्याणी हरभट याचा पक्ष धरून आह्मी पावन करितो नतर अह्मी उत्तर केले की अह्मास श्रेष्ट श्रीकराड तुह्मी हि गोष्टीचा अभिमान धरू न ये ते न ऐकिता आह्मास शब्द लावितात आणि अभीमान धरून हरभट याचे पक्तीस भोजन करितात त्यास आपणास पत्र लिहिले आहे तर आमचे पत्र जमेस न धरिता परभारे श्रवण जाहाले आहे तर तुह्मी याची चौकशी होई तो पर्यत भोजनास तुह्मी न जाणे या प्रमाणे एक पत्र हरिभक्तपरायण राजश्री बावास व एक पत्र ग्रामस्तास ऐशी दोन पत्रे सायकाळ पावेतो येऊन पोहोचेत ऐशी केली पाहिजेत मिति भाद्रपदशुद्ध १३ बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनति