Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

लेखांक २६४
१७०८ माघबा। ५

श्री
करीना भिवाजी गोसावी सु ।। सबा समानीन मया व अलफ लेहून दिल्हा करीना ऐसा जे आह्मी सारे एकत्र होतो घरात बनेनासे जाहले सा। वेगळे निघावेसे जाहले तेव्हा अवघे वधू मिळोन त्याची नावे वडील बाजीपत त्याहून धाकटे जोतीपत ते मृत्य पावले त्याचे पुत्र सखारामपत तिसरे आह्मी भिमाजी गोसावी चवथे कृष्णाजीपत पाचवे सदाशिव गोसावी ऐसे मिळोन ति-हाइता कडे हरिपत याचे वाड्यात गेलो की आपले आपल्यात समजावे तेव्हा तेथे खटखट जाहली तेथून मग पचाईत नावनिसी राजश्री विटलपत कुलकर्णी व हरीपत व वेदमूर्ति श्रीपादभट नि।। घोरपडे व जिवाजी पाटील ह्मणो लागले की तुह्मी आपलेल्यात कजिया करिता त्यास तुह्मी जामीन अवघे जण निराळे निराळे देणे त्या वरून अवघ्यानी जामीन सदरहू पचाईता जवळ दिल्हे मग त्यानी विभाग करून दिल्हे तीर्थस्वरूप बाजीपत याचे व अवघ्याचे विद्यमाने करून दिल्हे त्या प्रमाणे ज्याचा विभाग त्यानी घेतला आणि आपलेले घरास गेले नतर काही येक दिवस गेले तेव्हा कर्जदार विठल रघुनाथ कुलकर्णी याचे कर्ज आह्मा कडे वारावे ह्मणो लागले ते पैका मागू लागले त्यास वाटे केले ते समई सोने बूड चोरानी नेले ५ व आमच्या सास-याने भक्षिले ५ येकूण तोले सुमारे १० दहा ते आमच्या विभागात धरिले व बाजीपत याज कडेस ३ व सखाराम याज कडेस तोळे ५ व कृष्णजीपत याज कडे २ तोळे व सदाशिव बावा याज कडे येकूण तोळे २० वीस हे विभागानरूप सर्वत्रानी मोड सोसावी ते न करिता आह्मा येकट्यावर दाहा तोळे सोने चोरानी नेले व सोइ-यानी भक्षिले ते आह्मा वर घातले त्याचा फडशा करून देणे ह्मणोन आह्मा कडे कर्ज घातले आहे त्याचे मन मनाऊ ऐसी कटकट सदाशिव गोसावी व आह्मी करू लागलो तेव्हा कर्जदार यानी सदाशिव गोसावी यासी निकड केली की आमचा कर्जाचा निकाल करून देणे त्याज वर कर्जदारास काय सागितले न कळे आणि सदाशिव गोसावी दिवाणात राजश्री मालोजी घोरपडे याचा कारभारी याज कडे गेले आणि अह्मा वर पाच रु।। मसाला करून आमच्या पाठी मागे माणसे लावून बेअब्रू करू लागले सध्याकाळपर्यत उपोषण जाहले तेव्हा सध्याकाळी च्यार पचाईत व हकीम म्हणो लागले की कर्जदाराचे मन मनावणे मग तुमचा फडशा सोन्यावानेचा करून देऊ त्या नतर आह्मास रात्रौ भोजनास निरोप दिल्हा नतर कर्जदार याचे आह्मी मन मनाविले आणि पचाइता कडे गेलो की सावकाराचे मन आम्ही मनाविले पुढे आमचे मनास आणून विल्हे लावणे ऐसे करिता काही येक दिवस गेले तो आणखी आपल्या आपले मधे कटकट होऊन बाजीपत व आम्ही क्षेत्रास क-हाडास साल गु।। आलो बाजीपत निघोन देवास रत्नागिरीस गेले उपरातिक सदाशिव गोसावी हि कराडास आले तेव्हा बाजीपत येथे नाहीत तेव्हा कटकट होईल याज करिता आम्ही वेदमूर्ति वेकण जोसी यासी विचारिले की बाजीपत देवास गेले सदाशिव गोसावी येथे आले तेव्हा व्यकणजोसी बोलिले की बाजीपत गेले तुह्मी आपले घरास जाणे त्या वरून आह्मी घरास गेलो मागाहून सदाशिव गोसावी याणी क्षेत्राहून समस्ताचे पत्र व मसाला रु।। २ दोन करून आह्मास पाठविले त्याज वर आह्मी घरी न होतो