Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

लेखाक २६८

श्री

तकरीर सदाशिवबावा यास कलमझाडा विचारिला महादेवबावा ब्रह्मचारी अस्ता तुमचे पाच बधू याचे व्रतबध त्यानी करविले ते तुमचे तीर्थरूप असता व्रतबध करविले किंवा मृत्य पावल्या वरी व्रतबध करविले ते व कोण कोणाचे व्रतबध कोणाचे माडी वरी करविल्ले ते सागावे महादेव बावा ब्रह्मचारी असता करावयास कारण काय हे सागावे कलम १

याचे उत्तर बावानी व्रतबध केले ते धर्मार्थ आमचे तीर्थरूप असता बाजीपत च जोतीपत याचा व्रतबध जाहला तीर्थरूप निवर्तल्या वरी भिमाजी बावाचा क-हाडी व्रतबध महादेवबावानी केला कुणाचा माडी वरी केला हे आपल्यास ठावूक नाही कृष्णाजीपताचा व्रतबध कुमट्यात जाहला कुणाचा माडी वरी जाहला हे ठावूक नाही आमचा व्रतबध बाजीपताचा माडी वरी जाहला येणे प्रमाणे लिहिले सही