Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

लेखाक २६३
१७०८ माघशु॥ २

श्री
वेदशास्त्रसपन्न राजमान्य राजश्री समस्त ब्राह्मण क्षेत्रकराड स्वामीचे सेवेसी
करीणा बो। कृष्णाजी बल्लाळ सु।। सबा समानीन मया अलफ तीर्थस्वरूप भिमाजीबावा याचे पुत्र उभयता लस्कराहून घरास येऊन विभक्तपणा केला आह्मी वेगळे होत नाही ह्मणो लागले तेव्हा दिवाण माणूस लाऊन वेघळे घातले ते समई आपण बोलिलो जे चवघा प्रमाणे माझ्या मुलाचे लग्न करून देणे तेव्हा विभाग घेऊ ह्मणोन वाटणीस द्वाही दिली मग ति-हाइतानी लग्न करून द्यावे ह्मणोन सागितले असता त्याची वाट काही च नाही बळे च वाटा घेणे ह्मणोन तसती करू लागले मग आपण उसालिखाहून पूर्वी त्रिवर्ग वधू क्षेत्रक-हाडास आले होते सबब आपण क्षेत्रमजकुरास येऊन उभयेता वधूस क्षेत्राचे पत्र पाठविले मग आणिले आणि आह्मास आज्ञा केली जे तुझे बोलणे काय ते लेहून देणे त्यास माझ्या मुलाचे लग्न सा-यानी करून द्यावे मग चवथा हिसा जरा व जरा कागद व पोथी पुस्तक भाडी वगैरे वित्तविशय द्यावा येणे प्रमाणे बोलणे आहे सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना
शके १७०८ पराभवनामसवत्सरे माघशुद्ध द्वितीया 

तपसीलवार कलम
१ वस्त सोने व रुपे                     १ इनामाचा वाटा द्यावा
१ भाडी देखील + + पर्यंत            १ वतनाचा विभागाचा हिसा यावा
१ कापड नवें जुने                      १ गुरे व घोडी
१ हत्यारे                                  १ कुणगा झाड पिछाडी करून
१ कागदकतबे द्यावी
१ दाणे हरजिनस                        ३ कर्ज वाम
१ लस्कराहून मनोहर व सखाराम   १ देणें लोकाचे
यान काय मेळवून आणले             १ व घेणें लोका कडील
त्याचा उगवलेकर घ्यावें
विभाग यावा १ बूड काय जाहली
१ हिसेब घरचा आह्मास
समजाऊन                               --
                                             १७
द्यावा कलम १
१ मुलाचे लग्न करून द्यावे
१ दुसेरीयाची गावकी जोसीक
पत-
करिले त्या वरून उठवून
आह्मास पळ-
विले त्याचा मुशाहिरा यावा
----
१०
सदरहू धाकटे भाऊ सदाशिव गोसावी याचा विभाग वाटणीस येईल त्या प्रमाणे आपण विभाग घेऊन समजोन राहू यासी नवदीगर करू तर देवाचे अन्याई