Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक २५८ बालबोध
श्रीशंकर
स्वति श्रीमन्निखिल वसुधामूर्धावतसआदिमहासस्थानद-
क्षिणवाराणसी क्षेत्रकरहाटकस्थ वेदशास्त्रसपन्न राजमान्य राजश्रि समस्त ब्रह्मवृद
याशि प्रति समस्त ब्राह्मण अष्टेकर व तथा समस्त ब्राह्मण क्षेत्रभिलवडी अनेक साष्टाग नमस्कार विनति उपर येथील वृत्त आषाढवद्य ८ पर्यत समस्त सुखरूप असो विशेष अपली क्षेत्रस्थाची पत्रे आलि होति कि विसलापुरा मध्ये गोलभट व पुसाळकर आहेत या उभयताचि निर्गत क्षेत्रास येवुन शुत्ध होय तावत्कालपर्यत त्यास व त्याचे सासर्गिक आहेत त्याचे घरि दिखिल अनव्यवहार न करणे या अन्वये अपली पत्रे आलि ती मान्य करून पत्रान्वय व्यवहार करीत आलो प्रस्तुत वैपरीत्य ऐकिले कि विसलापुरास क्षेत्र आले होते जि गोष्ट न घडायाचि ती कैसि घडलि परतु न कळे यदर्थि आह्मास सशय झाला आहे अपण थोर आहेत वचनाचे प्रमाण अह्मास वो । मोरदीक्षित अरणके हे बोलिले होते तुह्मि अमचे पत्राप्रमाणे वर्तणुक करणे जे वेळेस विसलापुरकराची शुधता होईल ती तुमचे विचारे होईल अरणके याचे व अमचे झाले अपण जे केले ते समजोन च केले असेल विशेष लिहावया शक्ति नाही सुज्ञा प्रति विशेष काय लिहिणे हे नमस्कार १०००० वचन ४