Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
१ दताजी केशव नाईक देसाई व शामजी लिंगोजी व गिरमाजी झुगो देशपांडे याणी सन १११५ मध्ये पत्र दिल्हे त्यात शाम जोसी बि॥ रग जोसी मौजे धोम व आपदेव भट आडकर साकिन मौजे मा।र यास उभयतामध्ये पायरीयापासील उपाध्यपणाचा कजिया लागला होता त्याचा गोत बसून निवाडा करून थडीचे उपाध्यपण आपण निमे निमे उभयताकडे करून महजर दिल्हा त्याची हरकी रुपये १०० तुह्मी दिल्हे फौजदार स्वारीहून आलियावर फरमाना तुह्मास करून देऊ आमचे हाकदारीचा तगादा लागणार नाही ह्मणोन आहे कलम २
१ शके १६२७ सन १११५ मध्ये महजर जाला त्यात आप जोसी व उधव जोसी कसबे वाई यामध्ये लिग जोसी दिवाण जोसी यामध्ये भाडण लागून सदरेस आले त्यास सडिया साक्षीवरून यजुर्वेदी खरे जाले लिग जोसी खोटा जाला याजला लग्नमुहूर्त व जे वानी सरावा व कसबेयाचे चावडी व नावरस व गावात पचाग कोणास सागावयास निसबत नाही मुख्य राजमुद्रे यासी प्रतिदिवसी पचाग मात्र सागावे लग्न होई तेव्हा गावजोसी याणी जाऊन घटका घालावी ह्मणून कलम १
१ सदरहू आन्वये आनाजी जनार्दन सुभेदार प्रा। वाई याचे पत्र कलम १
१ महजर शके १६२७ मधील त्यात धोमच्या पायरीयावरील उपाध्यपण हाकीम व गोत मिलोन इनसाफ करून आडकर व जोसी यासी निमे वाटून दिल्हे गावचे उपाध्यपण व जोतीष जोश्यानी घ्यावे आउकरास समध नाही ह्मणोन कलम
१
---
५
किता पत्रे यास वर्षे आज ता। ७२ होतात कलम १
१ महजर शके १६२८ मधील विठल गोपाल नामजाद प्रा। जावली व देशक प्रा। वाई याणी करून दिल्हा त्यात यजुर्वेदी जोतिषी याजवल रामाजी रघुनाथ कजिया करीत होता की समत मुर्हे येथील जोतीष तुमच्या वडलानी आमच्या वडलास काही पैकी घेऊन व काही आपण धारादत दिल्हे ऐसे बाहालपत्र लेहून कपालास बाधून दिव्य केले खोटा जाला त्याणे यजितखत यजुर्वेदी जोतिषी यास लेहून दिल्हे आहे ह्मणोन कलम १
१ आज्ञापत्र कैलासवासी परशरामपत प्रतिनिधी याचे सन सबा मया अलफातील यजुर्वेदी जोसी याजला तेरा गाव व जाबुलखोरे येथील वृत्ती आपली ह्मणोन रामाजी रघुनाथ भाडत होता त्याणे तेल तुपाचे दिव्य घेतले तो खोटा जाला वतन तुह्मी यजुर्वेदीयाचे खरे जाले च्यारसे रुपये हारकी तुह्मापासून घेतली आसे ह्मणून कलम १
१ मोगलाकडील ठाणेदाराचा कौल सन १११६ तील विठल जोसी व शाम जोसी कसबे वाई व समत मुर्हे याचे नावे त्यात मुऱ्ह्यातील तेरा गावाचे मुतालिकीस रामाजी रघुनाथ व त्रिंबक सिवदेव याचे वडीलास विठल जोसी मा।र याचे वडीलानी ठेविला होता तेच खावद ह्मणोन भाडो लागले त्याचा निवाडा गोतमुखे करिता रामाजी रघुनाथ खोटा जाला आसे म्हणोन कलम १
१ सदरहू आन्वये देशमुख देशपाडे प्रा वाई याचे पत्र मोकदमानी यास
कलम
१
---
४
---
४
३ कितापत्रे आज ता। वर्षे ६३ होतात कलम
१ कौल रसूलखान याचा सन हजार ११२५ शाम जोसी गाव जोसी कसबे वाई याचे नावे लिग जोसी वलद आनत जोसी याणे जाहीर केले जे कालीवर पाढर रचली त्यापासून कसबे मा।रच्या जोसपणाची मिरास आपली आहे शाम जोसी नारायण जोसी हे आपले मुतालीक हे गावकराचे तोडे खरे करून देईन त्याजवर तुह्मी लेहून दिल्हे की गावजोतीष कदीम आपले वतन आहे कोटातील पचाग लिगोजीचे वडील सागत होते आपण त्याचे मुतालीक नव्हो येविसीचा पेशजी कृष्णरावजी फौजदार याचे वेलेस गोत मेलऊन निवाडा केला लिगोजी लटका जाला आपल्यास महजर करून दिल्हा त्याप्रो। वतन खातो त्याजवरून उभयतापासील कागद पाहाता लिगोजीने विजापूरचे पातशाहाचे वजीर याची खुदखते दाखविली त्यामध्ये इनाम व आडसेरी तेल पाने मरामत केले ऐसे आहे कजियाचा मा।र नाही तुह्मी आपली सनद गोत आहे ह्मणून सागीतले तेव्हा उभयता गोताचे साक्षीस राजी जालेत गोताने साक्ष दिल्ही त्यावरून लिगोजी खोटा जाला त्याणे तुह्मास यजितखत लिहून दिल्हे आहे तरी गावातील जोसीकास त्याजला तालुका नाही येविसी गोताने महजर करून तुह्मास दिल्हा आहे त्याप्रो। तुमचे गावजोसीक तुह्मी खाणे कोटातील जोतीष तो करील ह्मणोन कलम १