Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)

सदरहूप्रमाणे साक्षीदाराचे साक्षीत गुदरले आहे त्यास हाली हरदो वाद्याच्या तकरीरा दिल्ह्या व कागदपत्रातील व साक्षीतील हुजूर हाजर मज्यालस पंचाईत बसोन आन्वय मनास आणता यजुरवेदीयाकडील कागद लिग जोसी ॠग्वेदी याणे कजिया सन १११५ मध्ये केला त्यापलीकडे ई॥ शके १४२४ सन सलास तिसा मया ता। सन मया अलफ पर्यत आहेत त्यातील साराश कसबे मा।रचे वृत्तीविसी पहिल्याने यजुरवेदियाजवल केजल्याने कजिया केला होता तेव्हा केजल्याने रव्याचे दिव्य केले तो खोटा जाला त्याआलीकडे थिटे याणी कलह केला त्याचा निवाडा गोही साक्षीवरून होऊन थिटे खोटे जाले याप्रो। देना वेला कसब्याचे वृतीवर वादी उभे राहिले होते ते खोटे होऊन यजुरवेदी खरे जाले आहेत व यजुरवेदीयाणी कसब्याची वृत्ती थिटे याजपासी गाहाण ठेविली होती ती सोडऊन खत माघारे घेतले ते पत्र व गुरवापासून वाडा विकत घेतला त्याचे पत्र एकूण दोन कागद त्याजवर वासुदेव जोसी याच्या वडलाची साक्ष पणदरेकर ह्मणोन आहे व आपले भाऊपण्यात वृत्तीचे विभाग करून घेतले त्यावेलेस पत्रे साक्षेनिसी आहेत व वासुलकर जाबुलखोर्‍यातील वृत्ती आपली म्हणोन वादास उभे राहिले होते तेव्हा रव्याचे दिव्य रामाजी रघुनाथ वासुलकर याणी केले तो खोटा जाला धोमचे थडीचे वृत्तीविसी आडकर याणी कजिया केला होता त्याचा निवाडा पचाईतमते जाला आहे ऐसे वाद यजुरवेदीयाणी सागून वादे खोटे केले व वृत्ती गाहाण ठेविली व भाऊपणात वृत्ती वाटून घेतल्या याप्रो। दाखल्याचे कागद यजुरवेदियाजवल आहेत जर करिता वृती वासुदेव जोसी ॠग्वेदी याचे वडलाची असती तरी इतक्या वेलेस कोठे तरी उभे राहिले आसते ती गोष्ट जाली नाही व थिटेयाजपासी वृत्ती यजुरवेदीयाणी गाहाण ठेविली त्या कागदावर साक्षी वासुदेव जोसी याचे वडलाची आहे यावरून व सदरहू कागदपत्रावरून पुरातन वृत्ती यजुरवेदीयाची च ऐसे स्पष्ट दिसण्यात येते व आलीकडे सन १११५ पासून वासुदेव जोसी याचा बाप लिग जोसी याणे दोन वेला कजिया केला तेव्हा तो खोटा जाला वृत्याशी नव्हे याप्रो। निवाडे जाले आहेत वासुदेव जोसी याजवल शके १४८६ तील व शके १५०० तील एकूण दोन कागद आहेत त्यापैकी चवदासे शासीतील कागदात पील जोसी बि॥ बोप जोसी कसबे वाई ऐसे ह्मटले आहे त्यास वासुदेव जोसी याचे वउील वाईस राहात आले यामुळे जोसी कसबे वाई यावरून वृती त्याची च कसी ह्मणावी दुसरा कागद तो वाघोलीचे जोतीष कुलकर्णीविसीचा आहे त्यास तो गाव या कज्याचे वृतीतील नव्हे एकूण हे दोन कागद या मनसुबीचे उपयोगी नाहीत याप्रो। उभयताकडील कागदाचा मा।र आहे व साक्षीतील आन्वय पाहाता बहुतेकानी जोतीषपण पुरातन या यजुरवेदियाचे सागीतले आहे व काही साक्षीत माघे वाद इतराचे पडले होते त्याजला यजुरवेदीयाणी खोटे केले त्या वेलेस कागद जाले आहेत त्यावर आपल्या वडलाच्या निशानिया आहेत ह्मणोन आणखी साधने यजुरवेदीयाचे साक्षीत गुदरली आहेत वासुदेव जोसी याचे साधन पाहाता काही कसबेयाचे साक्षीदाराचे बोलण्यात मूळ वतदार लिग जोसी ॠग्वेदी ऐसे सागोन भोगवटा हि कोठे कोठे कसब्यात चालत होता ऐसे सागीतले त्यास हाली मूळचा वतदार ह्मणोन साक्षीदारानी सागीतले हे खरे ह्मणावे तरी कसब्याखेरीज इतर साक्षी पाहाता एका एका हि साक्षीत दाखला पुरत नाही व प्राचीन कागद यजुरवेदियाजवल आहेत त्या कागदावर साक्षी कसबे मा।रचे वतदाराच्या आहेत तेव्हा हाली बोलण्याचे प्रमाण कसे धरावे भोगवटा चालल्याचा मा।र तरी यजुरवदियाचे लिहिल्यात वासुदेव जोसी याच्या वडलास दिवाणचा आश्रय आणि विद्यापात्र दिवाणात पचाग सागत यामुळे कोठे कार्य प्रयोजन सागू लागले आमचे वडील दुर्बल आणि आविद्वान होते ह्मणोन व साक्षीत हि दिवाणजोसी ऐसे पुरले व पेशजी लिग जोसी याने कजिया केला तेव्हा हि दिवाणजोसी ह्मणोन निवाडा जाला आहे त्यास दिवाणच्या आश्रयाने पाचा दाहा घरी भोगवटा जाला त्यामुळे कसबेयाच्या साक्षीत कोठे कोठे सशय पडला तो जर करिता वृत्यशी आसता तरी खोरी वगैरे साक्षीत दाखला पुरता तो काही च पुरला नाही तेव्हा वृती त्याची नव्हे याप्रो। सर्व हि आन्वय पाहाता पुरातन जोतीषपणाची वृती या यजुरवेदियाची खरी आसे सदरहू प्राचीन कागदावरून व हालीचे साक्षीवरून जाले वासुदेव जोसी वृत्ती आपली यजुरवेदी मुतालीक ऐसे ह्मणत होता त्यास साक्षीमुखे आथवा कागदपत्री दाखला पुरला नाही खोटा जाला त्याप्रो। यजितपत्र तुह्मास आपला पुत्र बाल जोसी याचे दस्तुरे आपले सहीनिसी लिहून दिल्हे आहे व हाली हे निवाडपत्र भोगवटियास तुह्मास करून दिल्हे आसे तरी सदरहू कसबा वाई व खोरी वगैरे गाव व किले येथील जोतीषपणाची वृती पुरातन तुमची आहे वासुदेव जोसी ॠग्वेदी तुह्मासी वृती आपली ह्मणोन कजिया करीत होता तो खोटा जाला त्याजला वतनासी समध नाही तरी तुह्मी जोतीषपणाचे कायदे पुरातन चालत आले आसतील त्याप्रो। घेऊन आपल्या पुत्रपौत्रादिवशपरपरेने वतन आनभऊन सुखरूप राहाणे तुम्ही खरे जाला ते सबब तुमचे माथा जीवनामाफीक रुपये केले ते पोता जमा आसेत म्हणोन पत्र १

सदरहू आन्वये थोडक्यात सारा गोशवारा लेहून त्रोटित पत्रे ल्हाहावी की पत्राची तालीक घेऊन आसल पत्र यजुरवेदी जोसी याजवल परतोन भोगवटियास देणे म्हणोन

१ देशाधिकारी लेखक वर्तमान भावी यास
१ देशमुख व देशपांडे प्रा। वाई यास
१ भवानी शंकर हैबतराव यास
३ तीन किल्यास
४ मोकदमास च्यार
         १ कसबा वाई
         २ खोरी दोन एकूण
         १ समत हावेलीचे गाव
       ----
         ४
---
१०