Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)

१/२ सदरहू आन्वये ठाणे प्रा। वाई येथील कौल एकूण कलम १
                                                                                         १/२
१ शके १५५२ मध्ये कार्तिक पौर्णिमे ग्रामस्त कसबे वाई याणी ग्रहणकाली कडत जोसी को। मा।र यास प्रतिवषी पासोडी एक व गहू व गुढियाचे पाडव्यास कुडव एक देऊ ह्मणोन पत्र लेहून दिल्हे यास वर्षे आज ता। १४८ होतात कलम १

२ शके १५५६ मधील पत्र विभागाविसीची यासी वर्षे आज ता। १४४ होतात त्यात आन्वय

१ महजर मध्वाजी कृष्ण पडीत हावालदार याचे वेलेचा की नाग जोसी बिन गण जोसी व कडत जोती बि॥ रग जोसी या उभयतामध्ये विभागाचा कजिया लागला होता कडत जोसी ह्मणे की वृत्तीमधे दिवाणात होन पडले आहेत त्याचा विभाग नाग जोसी याणे दिल्हा नाही. याजमुळे विभागास खलेल पडली होती नाग जोसी विभाग दिल्हा ह्मणोन रवा काढीन ऐसे बोलोन दिव्यास सिध्द जाला मग कडत जोसी याणे रवा राहून नारायण भट थिट्यापासील आठरा होनाचा कतबा सोडऊन नाग जोसी यास विभाग दिल्हा ह्मणून त्याजवर आवघ्या दिवाणलोकाची व पाढीची निशाने आहेत कलम १

१ कडत जोसी याणे नाग जोसी याजपासून वीस होन पडले होते ते घेऊन वृत्तीचा विभाग साक्षीनिसीं विभागाचे पत्र करून दिल्हे आहे कलम १/२

१ तिमाजी पताजी याचा कागद सन सबा सलासीन आलफचा कौल मोकदम देह १० यास त्यात कडत जोसी बि॥ रग जोसी व नाग जोसी बि॥ गण जोसी यास जोतीषाकरिता कसबे मा।री गरगशा लागला होता त्याचा निवाडा करून सदरहू गाव कडत जोसी याजकडे दिल्हे आसेत ह्मणऊन यास वर्षे आज ता। १३६ होतात कलम १

१ शके १५८० मध्ये रग जोसी याने बाप जोसी यास ब्राह्मणसभा विद्यमाने देशकुलकर्णीयाचे घरी शफत पुरसर पत्र लेहून दिल्हे की कसबे वाईचे जोतीष वर्षेलीप्रो। आनभवावे मध्वाजीपतावेलेस महजर जाला आहे त्याप्रो। समत मुर्‍हे व हावेली चे गाव वाटणीप्रो। चालवावे ह्मणोन यासी वर्षे आज ता। १२० होता आहेत कलम १

१ सन समानीन आलफात पिलावा देशमुखीण प्रा। वाई यासी कोन्हेर रगनाथ सरसुभेदार प्रा। कर्‍हाड माहालनिहाय यानी पत्र पाठविले की शकर जोसी वाईकर यामध्ये व आडकर यामध्ये धोमचे थडीचा वृत्ती समधे कजिया आहे त्यास उभयता तुह्मी सागाल त्यास राजीनामे त्यावरून तुह्माकडे पाठविले आहेत तरी सत्य स्मरोन निवाडा करोन हुजूर लेहून पाठवणे ह्मणोन यास वर्षे आजी ता। ९२ होतात कलम १

१ कौल सुभा प्रो। वाई सु॥ मया अलफाचा त्यात शाम जोसी यजुर्वेदी व आपदेव भट आडकर याचे नावे की तुम्हा उभयतामध्ये धोमचे थडीचा गरगशा होता निवाडा तारोतार उभयतानी निमे निमे घ्यावे म्हणून यास वर्षे आज ता। ७९ होतात कलम १

५ किता पत्रे आज ता। ७३ होतात कलम ५