Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)

कसबे मा।रचे जोतीषपणाचा व इनामाच्या सदा आपणापासी आहेत कालीवर यास बलूते अद्यापवर नाही कडत जोसी वृत्ती चालवावयास ठेविला त्याचा पुत्र रग जोसी त्याचा पुत्र शाम जोसी त्याचा पुत्र गोविंद जोसी याप्रमाणे पुरुषाचा भोगवटा वतनात त्याचा चालत आला आहे त्यात कडत जोसी याणे सालसूद गुमास्तगारी केली तेव्हा कजिया जाला हे आपणास ठाऊक नाही रग जोसी आपले च वतन ह्मणोन चालऊ लागला ते समई आमचे वडील दरिद्री होते आक्षरहिन्यामुळे वाद सागावयाचा इलाज नव्हता रसूलखानाचे कारकीर्दीस वाद्याने महजर करून घेतला त्यात लिग जोसी याणे शूद्रवर्गाचे जोतीष आनभवावे ह्मणोन लि॥ आहे परतु त्याप्रो। आह्मी आनभविले नाही आलीकडे आक्षेप करावा तरी वादी प्रतिनिधीचे सोइरे यामुळे व नातवानीमुळे आह्माकडून आक्षेप जाला नाही कडत जोसी याचा बाप रग जोसी यास मुतालीक ठेविला होता ते वेलेस त्याचा व त्याचे बापाचा कोणासी कजिया होऊन दिवाणचे आगर जमीनदाराचा कागदपत्र वाईकर जोसी व हरदो खोरीयाचे जोतीषपणाचा त्या दोघाचे नावाचा गगाधर जोसी याजवल असला तरी आपण कजियास खोटे वतन पूर्वीपासून आमचे आहे रग जोसी यास गुमास्ता ठेविलियास आजमासे पावणे दोनसे वर्षे जाली आहेत त्यालीकडे गगाधर जोसी याच्या वडीलाचे वतन ऐसा कागदपत्र निघाला आणि पाचाच्या कयासास आला तरी त्यास आपण मान्य आसो नायकवाडी व सेरीकर व हशम वगैरे लिग जोसी यापवेतो चालत होते सदरहू हकीकत आह्मी लेहून दिल्ही हे जमीनदाराच्या व पाढरीच्या मुखे व सक्राजी सभदेव व आवधुत तिमाजी व लिगोजी बापोजी देशपाडे याचे वशाचे मुखे खरे करून देऊ न देऊ तरी आपल्यास वतनासी समध नाही ह्मणोन १

येणेप्रो। तकरीर लेहून दिल्हेवर प्राचीन कागदपत्र काय आसतील ते दाखवणे ह्मणोन उभयता सरकारातून आज्ञा केली त्याजवरून कागद दाखविले त्यातील खुलासा

१ तुह्माकडील कागद शके १४२४ दुदुभी नाम सवछरे सु॥ सलास तिसा मयामध्ये कसबे मा।री हकीम व गोत मिलोन आक जोसी यास महजर करून दिल्हा की एसोबा बिन रामोबा केजले याणे फिर्याद केली की का। मा।रचे जोतीष आपले ह्मणून रवा काढीन तेव्हा हाकीमाने तेल रवा नेमून दिल्हा एसोबाने रवा काढिला खोटा जाला आक जोसी बिन नारायण जोसी याचे पुरातन वतन ह्मणोन यास वर्षे आज ता। दोनसे श्याहत्तर २७६ होतात

कलम १

१ शके १५०२ मध्ये काय दरणा बि॥ साय दरणा गुरव याणे आपला घर ठाणा बाल जोसी बिन रग जोसी मिरासी प्रा। वाई यासी पाच होन घेऊन विकत दिल्हा त्या खरेदीपत्रावर साक्ष गोविंद जोसी पणदरेकर ऐसे लि॥ आहे वगैरे जणाच्या साक्षी आहेत गोविंद जोसी तो वासुदेव जोसी याचा आजा या पत्रास आज ता। वर्षे १९८ होतात कलम १

१ शके १५०४ गण जोसी याने नारायणभट थिटे कसबे वाई यापासून दिवाणचे तसदीकरिता कर्ज होन १८ घेऊन आपले जोतीषपणाचा विभाग नीम गाहाण ठेविला एविसीचे पत्र लेहून दिल्हे त्यावर साक्षी गोविंद जोसी पणदरेकर ह्मटले आहे वगैरे कोणाच्या साक्षी आहेत यास वर्षे आज ता। १९६ होतात कलम १

२ किता कागद यास वर्षे आज ता। १८२ होतात कलम २
१ महजर सन सबा तिसैन तिसा मयामधील त्यात रामेश्वरभट बिन नारायणभट थिटे वादास उभा राहिला तेव्हा रग जोसी बि॥ नरस जोसी याणे विदित केले की पेशजी पासी भास्कर थिटा यास कसबे वाई येथील जोतीषपणाचे गुमास्तगिरीवर ठेविला होता तो आपले च ह्मणो लागला आणि दिव्यास राजी जाला तेल तापविले मग मागे सरला खोटा होऊन एजितखत लेहून दिल्हे ते पाहून मनसुबी करणे त्याजवरून एजितखत पाहून व गोही साक्ष घेऊन निवाडा केला रामेश्वरभट थिटा खोटा जाला यजुरवेदी खरे जाले ह्मणोन कलम १