Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)

त्याचे रवे दिव्य होऊन महजर जाले व आणखी वाद जाहाले व आलीकडे धोमचा वाद जाहाला एक एक वादी चालीस पन्नास वर्षे कैलासवासी सिवाजी माहाराज व आईसाहेबपर्यत(त) होत आला त्याचा महजर व एजितखते जाली आहेत वासदेव जोसी याचे वडीलाचा दाखल कधी च ना गावातील च्यार ब्राह्मण आगातुक आहेत तैसा हा ही याचा वडील विद्येच्यामुळे दिवाणात जात होता यास्तव दिवाण जोसी ह्मणो लागले व याचे शरीरसमधी बहुत ह्मणोन त्यानी आह्मावर उभा केला खोटा जाला आहे परतु शरीरसमधी याणी दिवाणास अर्ज करून पचाग मात्र कोटामध्ये सदरेस सागावे तेथे लग्नमुहूर्त होईल ते आह्मी करावे याप्रमाणे आजपर्यंत चालत आले प्रस्तुत कोट उजाड पडला आहे परतु कोटातील लोकाचे लग्ने जाली तरी आक्षत आह्मी घेत आहो व वासुदेव जोसी याची मुजी व त्याचे वडीलाची लग्ने व मुजी आमच्या वडीलानी घटका घालून लग्नसिध्दी करून आक्षता घेत आले ऐसे आसता वासुदेव जोसी आह्मास ह्मणतो जे आपले मुतालीक आहेत त्यास ही गोष्ट अप्रमाण आह्मी कोणाचे मुतालीक नव्हो वृत्ती पुरातन आमची आहे वडील वडील खात आले त्यास वासुदेव जोसी मुतालीक ह्मणतो याप्रमाणे त्याचे खरे करून दिल्हीयास आपण खोटे ह्मणून १

वासुदेव जोसी याणे लेहून दिल्हे की कसबे वाई व जोरखोरे व जांबुलखोर वगैरे गाव येथील जोतीषपणाचे वतन पुरातन आपले वडील वडील आनभवीत आले त्याची नावे दखल नाहीत आलीकडील पुरुषाची नावे मूळ पुरुष नरस जोसी त्याचा पुत्र लिग जोसी त्याचा गोविंद जोसी त्याचा माहालिग जोसी याचा पील जोसी त्याचा गोविंद जोसी त्याचा कृष्ण जोसी त्याचा आनत जोसी त्याचा लिग जोसी त्याचा हाली आपण वासुदेव जोसी याप्रमाणे आपली वशावल आहे इदलशाई कारकीर्दीस आमचे वडील कसबे मा।रचे जोतीषपण चालवीत होते ते प्रतिष्ठित विद्वान होते त्याणी दिवाण सेवेमुळे गावात फिरावयाची गगाधर जोसी याचे वडील कडत जोसी याचे पुत्र रग जोसी यास पाढरीचे सेवेकरिता ठेविले ते चालवीत आसेत आपले वडील सरकारची सेवा करीत ते वेलेस कजिये पडले होते ते समई याचे वडीली व्यवहार सागून त्याचे निवारण केले हे सेवकपणे होते इदलशाई बुडाली याउपरात हे च धणी होऊन गाव चालवीत होते व आपण दिवाण चाकरी करीत होतो याजवर मोगलाई जाली त्यामुळे मुलूक उजाड पडला भाऊबद परागदा होऊन गेले व आमचे वडील आनत जोसी मृत्यु पावले त्याचे पुत्र दाद जोसी च लिग जोसी यास आक्षर नाही आन्न भक्षावयास नाहीसे जाले तेव्हा गगाधर जोसी याचे वडील खावद ह्मणोन गाव चालऊ लागले रुसुमखान याचे वेलेस आमचे पिते लिग जोसी याणी कजीया गगाधर जोसी व गोपाल जोसी याजपासी केला त्यास देशमुख व देशपाडे व चापसेट कारभार करीत होते ते समई कैलासवासी परशरामपत प्रतिनिधी आमच्या वाद्याचे सोइरे यामुळे त्याणी याजला आज्ञा केली की हे आमचे शरीरसमधी आहेत याचे जोतीषपणाच्या वतनावर स्थापना करणे त्यावरून देशमुख व देशपाडे व चापसेट सेट्यानी ठाणियामध्ये कजिया मनास आणून पैका टका ठाणेदारास देविला व आपण हि घेतला आणि आमचे बापास मा।र देऊन कैदेत ठेऊन गाव जोतीषपणास समध नाही आपण दिवाण जोसी ऐसे शामजी लिगोजीने आमचे पित्यापासून एजितखत लेहून घेतले त्यावर आमच्या पित्याचे हातची सही व देशपाडे याचे बिकलम नाही त्यापासून दिवाण जोसी ह्मणतात यामागे भोगवटा गाव जोसी ह्मणोन होता पूर्वी इदलशाई कारकीर्दीस सक्राजी सभदेव व आवधुत गिरमाजी देशपाडे याणी कजियामुळे जोरखोर व जाबुलखोरे वगैरे गाव अमानत करून मानभाग गगाधर जोसी याचे वडीलापासून घेत होते हे देशपाडे यास जाहीर आहे