Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १७६ श्री
यादी गोविंद जोशी बि॥ शाम जोसी लक्ष्मण जोसी बि॥ रामचद्र जोसी यजुरवेदी जोतिषी कसबे वाई व जोरखोरे जाबुबखोरे समत मुर्हे वगैरे गाव समत हवेली व किले पाडवगड व किले कमलगड व किले कलेजा को। मा। सु॥ तिसा सबैन मया व अलफ सन ११८८ शके १७०० विलबी नाम सवछरे तुह्मास दिल्हे निवाडपत्र ऐसे जे तुह्मी हुजूर किले पुरदरचे मुकामी येऊन विदित केले की सदरहू जोतिषपणाविसी वासुदेव जोसी बि॥ लिग जोसी ॠग्वेदी याणे कजिया करून कैलासवासी श्रीमत नानासाहेब याजपासी फिर्याद होऊन मनसबीबदल आह्मास हुजूर पुणियास आण उपरात त्याणे व आह्मी तकरीरा व जामीन देऊन प्राचीन कागदपत्र दाखविले त्याजवर वाद्याने वतनाची जप्ती करविली यानतर हर दोजण साक्षीदाराचे साक्षीस मान्य जालो त्याच्या साक्षी कैलासवासी श्रीमत माधवरावसाहेब याचे वेलेस जाल्या वतन जप्त होते ते मोकले करून तुह्माकडे पहिलेप्रो। चालते केले परतु निवाडपत्र जाले नाही तरी हाली साहेबी मनास आणून मनसुबीचा फडशा करावा ह्मणुनु विनति केली त्याजवरून दप्तरातील कागदपत्र पाहाता शके १६१८ मध्ये उभयता वाद्याही तकरीरा लेहून दिल्ह्या त्यातील आन्वय
तुहमी गोविंद जोसी याणी लेहून दिल्हे जे पूर्वी वासुदेव जोसी ॠग्वेदी याचा वडील कृष्ण जोसी पणदरेकर थोर विद्यापात्र होता त्याजपासी मुरार जगदेराव ब्राह्मण दरिद्री भक्षावयासी नाही यास्तव त्याणे कृष्ण जोसी याजवल आपले हवाल सागीतले तेव्हा जोसी याणी त्याचे सामुद्रिक लक्षण पाहोन ईश्वर तुझे बरे करील ऐसे सागून आपण कोलापुरास जाऊन श्री चे आराधन केले देवी प्रसन करून घेतली आणि मुरार जगदेराव यास विजापुरास पातशाहाकडे पाठविला तेथे त्याला सेवा लागली उपरात त्याणे कृष्ण जोसी यास पालखी व घोडी पाठऊन विजापुरास घेऊन गेले आणि पातशाहास भेटऊन गौरव करविला कसबे मा।री श्री बिदुमाधवाचे देवालय पडले होते तेथे घर बाधून देऊन कर्हाड व कोल्हापूर प्राती गाव इनाम कसबे वाघोली व बावधण व कसबे वाई वगैरे गावी इनाम वर्षासने करून दिल्ही त्यापासून कसबे मा।री दिवाणात चाल पडली त्यामुळे गावातील ब्राह्मण व लोक आर्जव करू लागले व दिवाणात पचाग व मुहूर्त सागून कार्य प्रयोजने सागू लागले प्रशसा बहुत जाली दिवाणातून तेल व पाने व पासुडी व पायपोसीचा जोडा व वाखणी व आडीसेरी व रस ऊस सेरीमध्ये व तश्रीफ याप्रमाणे करून घेतले त्याबरहुकू(म) काही दिवस चालत होते मरारपती तुला केली तेव्हा कृष्ण जोसी यास लक्ष रुपये प्राप्त जाले व तुलापुरामधे आसामी करून घेतली आणि सोला सेराची सुवर्णाची मुहूर्त अनुष्टानास्तव केली होती ती त्यास दिल्ही तिजवरील द्रव्य पलाले ईश्वरक्षोभ जाला तेव्हा मुहूर्तीचे हातपाय मोडून खाऊ लागले दरिद्रता प्राप्त जाली ते समई शरीरसमधी गावामध्ये होते त्याणी सरक्षण केले त्या कृष्ण जोश्याचा पुत्र आनत जोसी त्याचा लिग जोसी त्याचा हाली वासुदेव जोसी याप्रा। वाद्याची हाकीकत आहे आमची हाकीकत तरी आपले वडील वडील ताब-सिलसे व हेलवाक कोले यापासून रोहिडखोरे यापर्यत जोतीषपणाची वृती आनभवीत होते व कसबे मा।री आपले कडत जोसी होते त्यास आक्षर नाही आणि एकटे यामुळे वृती चालवावयास आजुलास गेली वृती नाकर्तेपणे बुडाली गावात लग्नमुहूर्त जाली तरी घरोघरचे ब्राह्मण आक्षत घेऊ लागले भाऊबद एकदोन होते त्याणी वृत्तीस नागवण पडली ह्मणोन नारायणभट थिटे यापासून कर्ज वृत्तीचा त्याजला गाहाण दिल्हा कर्ज द्यावयास सामर्थ्य नाही ह्मणोन ते हि वृत्ती टाकून पलोन गेले नारायणभट वृत्ती खाऊ लागला त्याची पाठ सर्व ब्राह्मण राखू लागले पुढे कडत जोसी गावास आलियावर कतबा सोडऊन वृत्ती घेतली परतु चालवावयासी कोणी नाही तितक्यात वासोलकर व धोमचे मुतालीक वादास उभे राहिले वासोलकर याणी भुते घालून कडत जोसी यासी मारिला त्याचा पुत्र रग जोसी लाहान भक्षावयास न मिले दावेदारानी कसाले दिवस दिवस करावे कोठे उभे राहू न देत वाईस आले तरी धर्मास कोणी अक्षत देत ऐसे काही दिवस चालले पुढे थोर जालियावर वासोलकराचा धोमचे थडीचा वाद लागला