Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १७१
भीमाचार्य अस्टपुत्रे वेंकटभट अस्टपुत्रे लक्षुमीधरभट मांडोगणे जानभट माभलेस्वर अग्नहोत्री रंगभट चित्राउ सिवरामभट थिटे रंगोजी पुजारी विठलदेऊ अंतभट बिन जागदेभट यमाजी अयाचीत तिमणभट भीर बालभट बिन नारायणभट तुकदेभट पारनेरकर शंकरभट सेडिये नारायणभट बिन नरसींहभट गंगाजीराम सिउभट सिरदेकर |
रामभटट गोदातीर नरसींहभट गिजरे नारायणभट्ट चित्राउ भानभट दिघे नारायणभट चित्राउ बालभट ढेकुणे सरकभट पुजारी नरसीहदेऊ कृस्णभट पुजारी बीदमाधव रामेसवरभट सेडे अंकभट चित्राउ तिमणभट सातपुते संकरभट पिटके रघुनाथभट तिमणभट कसबे वा कर तिमणभट तुकदेभट रुद्रंभट वालिबे कौमे व फर्जदानी तिमणभट बिन कृस्णंभट |
व बाजे हिंदु व मुसलमान इनामदार पा। मजकूर हुजूर येऊनु मालूम केले जे आपणासी इनाम जमीन व ब्याहाडीया रोजीना बा। खुर्दखते वजीरानी कारकीर्दी दर कारकीर्दी महद कदम व इस्तकबील हैबतखान व ई॥ याकुदखान व ई॥ रजेस-माहमद व बा। खुर्दखते साबीका ता। सन सबा चालत आले आहे सन समानामधे नरसीहभट टोल हुजूर येउनु मालूम केले की जे इनाम आहेती ते तजेगिरीन करून घेतले आहेती ज्याच मुकासावर तरफ होय ते वखती खुर्दखते करून घेती ये वजेचे इनाम आहेती ते अमानत करणे ह्मणउनु अर्ज केला त्यावरून माहालासी खुर्दखत सादर जाले की ताजे खुर्दखत घेउनु येईल त्यासी इनाम दुमाले करणे ह्मणउनु एकदर खुर्दखत माहालासी गेलेयावरी माहाली कारकुनानी इस्कील करून इनामतीचा माहासूल व ब्याहाडिया अमानत करून आलाहिदा ठेविले आहेती आपले दुमाले केले नाही यावरी आपण हुजूर येउनु अर्ज करावे तरी साहेबी मोहीमसीर होते तेथे यावीयास फुरसती नवहे चि हाली बदगीस आलो आहो तरी आपणास जे इनाम आहेती ते ताजेगिरी नव्हती जेही दिधले आहेती त्याच्याच कारकीर्दीस भोगवटे जाले आहेती ताजेगिरी अमल बहुत दीस राहात नाही पा। मजकूर साहेबास मुकासा अर्जानी जाहाला ते वखती रदबदल करून तहकीकी मनासी आणौनु इनाम दुमाला केले ते पासू नु चालत आले आहे यास १० साले जाली दरम्याने काही इस्कील जाली नाही बेकुसूर चालत आले आहे नरसीहभटमधे व अपणामध्ये महजदाबदल भांडण आहे त्या बरअकसे साहेबापासी लायणी गैरयत बोलिला तरी साहेबी नजर अनायत फर्माउनु बरहक खातिरेसी आणौनु जैसे सालाबाद चालिले आहे तेणेप्रमाणे चालविले पाहिजे आपण द्वागीर आहो अपळ्याळ्या महजदे खुदाय तालाची बदगी करून साहेबास द्वा हेत असतो दरीबाब सरजाम होय मालूम जाले बराय मालुमाती इनामदार मजकूरु खातिरेसी आणौनु पेसजीचे भोगवटे व तसरुफाती पाहौनु जे इनाम दीधले आहेती ते ताजेगिरी नवहती नरसीहभट मजकूर लाइणी बद गोइै केली ऐसे मालूम होउनु तमाम इनाम व ब्याहाडिया दुमाले केले आहेती ई॥ ता। सन सबा चालिले आहे तेणेप्रमाणे चालवीजे सन समानीचा इनामाचा हक अमानत ठेविला आहे तो व तहासील केला असेल तो व बेहाडिया मना केला आहेती त्या दुमाळे कीजे दर हर साला खुर्दखताचे उजूर न कीजे औलाद व अफवाद चालवीजे तालीक घेउनु असली खुर्दखते फिराउनु दीजे पा। हुजूर खाने अजम अफजलखान पेसजीचे इनाम व हाली आहे आपळ्या खुर्दखत दीधले आहेती ऐसे कुली आपण च दीधले आहेती कोण्हेबाबे एक जरीयाची इस्कील न करणे पेसजीचे भोगवटियाचे कागद फुतरीताकरिता गेले असतील त्याचा उजूर न करणे तसरुफाती पाहौनु देत जाणे पा। मजकूरचा इनामदार हुजूर खुर्दख्ताबदल ये ऐसा अमल होऊ नेदणे ताजी परवानगी हुजूर ह्मणउनु रजा बा। खु॥ प्रमाणे इनाम मुसलमान व हिंदु व जुनारदार व तमाम इनाम दुमाला केले असे दुमाला कीजे बि॥ →पुढे वाचण्यासाठी इथे क्लीक करा
येणेप्रमाणे दुबाला केले असे व बाजे इनामदार हिंदु व मुसलमान व बाजे बा। भोगवटे प्रमाणे दुबाला केले असे दुबाला कीजे तालीक लिहून घेउनु असल परतोनु दीजे मोर्तब सूद
तेरीख ९ माहे रबिलोवल
रबिलोवल