Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
लेखांक १६.
१७०१ मार्गशीर्ष व॥ ६. श्री. २८ डिसेंबर १७७९.
पु।। राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं :-
विनंति उपरी. इंग्रजास तंबी करण्याची मसलत मोठी. दिवस केवळच थोडे राहिले. त्यास, नवाबबहादूर यांचे घरीं शादीचा समारंभ म्हणोन गुंता; तेंही जालें. याउपरीं अदवानीचा महसरा उठऊन चेनापट्टणाकडे सत्वर नमूद व्हावें. निघावयास दिवसगत न लागावी. याप्रमाणें तुम्हीं नवाबबहादूर यांसीं बोलोन लौकर घडवावें. दिवस कांहींच राहिले नाहींत. इंग्रजांची व नायमाराची लढाई लागली आहे. नायमार यांणीं इंग्रज सिकस्त केले, ऐसें वर्तमान इकडे आहे. त्यास, तिकडलें तों जवळ पैगाम, वर्तमान येत असेल, नवाबबहादूर यांस पुसोन कच्चें वर्तमान ल्याहावे. *नवाबबहादरांचा स्नेह जाहाला, त्यापक्षीं वर्तमान चोहूंकडील परस्परें कळत असावें. र॥ छ १९ जिल्हेज. हे विनंति.