Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)

                                                                                       लेखांक १९.                                                
१७०१ मार्गशीर्ष व॥ ६.                                                 श्री.                                                    २८ डिसेंबर १७७९.

पु॥ राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:--
विनंति उपरी. अदवानीचा महसरा उठवण्याविशीं नबाब हैदरआलीखां बहादूर यांस इकडील पत्रें पाठविलीं होतीं. त्यांचें उत्तर वकीलास नवाबांनीं लिहिलें कीं, महसरा लौकरच उठऊन अमीरुलउमराव यांसीं सलूख करितों. त्यास, अदियाप तालुकियांतील हांगामा मना जाला नाहीं. दिवसेंदिवस अधिकच उपसर्ग होतो, ह्मणोन वर्तमान येत आहे. ऐसियास, इंग्रजास तंबी करावी येविसीं नवाब निजामआलीखां बहादूर शरीक. त्यांच्या तालुकियास उपसर्ग, तेव्हां त्यांचा संतोष कसा राहील? लौकिक सर्वांस लागला. अदवानीमुळें नवाब नाखुष राहून विच्यार करितात. दक्षणचे सर्व दौलतदार यांचा एका जाला, हें वर्तमान इंग्रजास समजतांच, बहुत विच्यारांत पडून सर्द आहेत. त्यांत, अदवानीमुळें नवाब निजामआलीखां व नवाबबहादूर यांची नाखुसी, हें त्यांस समजतांच किती दाब कमी पडेल ? दुषमानास राजकारणास जागा होती. ऐशा कबाहती आहेत. मसलत इंग्रजाची मोठी, आणि मोठेच नफे. ऐसें असतां जूजकामाकरितां आपआपल्यांत नाखुसी राखणें ठीक नाहीं. नवाब निजामआलीखां बहादूर यांचा व सरकारचा स्नेह. मोठ्या तिढणी पडतात. यास्तव तुह्मीं व राजश्री नरसिंगराव मिळोन, नवाबबहादूर यांसीं बोलोन, अदवानीचा हांगामा, पत्र पावतांच मना होय, ते गोष्ट जरूर जरूर घडावी. ह्मणजे केली मसलत इंग्रजाची सिद्धीस जाईल. सर्व रीती व मनसबे नवाबांचे ध्यानांत. त्यांस पत्रें लिहिलीं, त्यांचे मसोदे तुह्मांकडे पाठविले, त्यावरून सर्व मजकूर कळेल. कडपे तालुकियांतून इंग्रज अदवानीस येणार. त्यास, बहादरांकडील फौजांनी हाटऊन घातलें. तेव्हां दुसरे वाटेनें अदवानीस यावें, या मनसब्यानें इंग्रज येत होते. हें नवाब निजामआलीखां बहादूर यांस समजतांच तमाम फौजा पाठऊन घांटबंदी केली. अदवानीचे बंदोबस्तासही फौज गाडद पाठविली. नवाबबहादूर यांजकडून महसरा उठतांच बंदोबस्त करून सिकाकोलीकडे जातील.*नवाब बहादर अदवानीचा महसरा उठवितील. तुह्मीं आपल्याकडील फौज पाठऊन अदवानीचा बंदोबस्त करावा, ह्मणोन निजाम आलीखान यांस लिहिलीं गेली. त्यावरून त्यांणीं फौज अदवानीस पाठविली. त्यासी बहादरांकडील फौजेसीं कलह न व्हावा. नाहींतर गोष्ट नासेल. आधीं अदवानीचा महसरा लौकर बहादरांनीं उठऊन न्यावा. ह्मणजे इंग्रजाची मसलत चांगले रीतीनें होईल. सर्व दूरंदेशी बहादरही समजतील. र॥ छ १९ जिल्हेज. हे विनंति.