Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

लेखांक २८.

श्री.

१६१२ आश्विन शुध्द १५
''राजश्री हवालदार व कारकून ता। कानदखोरे गोसावियासि :-

॥ ε अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य सेवक माहादाजी सामराज सुभेदार व कारकून महालानिहाय प्रांत मावळ नमस्कार. सु॥ इहिदे तिसैन अलफ. मोगलांचे धामधूम आपल्या राज्यांत आज तीस वरसे होत आहे. यामुळें मुलूक वैरान जाला. साल गुदस्ता मोंगलास रायगड कबज जाला. मुलकांत मोगलाईचा अमल चालिला. हाली श्रीकृपेनें आपल्या राज्याचा मामला थाटात चालिला. ऐसियासि देशमुख व देशकुलकर्णी व मोकदम त॥ म॥ सुभा एऊन अर्ज केला कीं, आपण वतनदार राजश्री साहेबाच्या पायासी एकनिष्ठ आहों. राजश्री कैलासवासी स्वामींचे वेळेस आपलीं वतनें अमानत करून हकाच्या मोईनी करून देत असेत. सांप्रत गनीमाचे धामधुमेकरितां व दुकाळाकरितां रयती गेली, मेली. रुईजुई राहिली. त्यास खावयास व वाहावयासी नाहीं. ए जातीचा रयतीचा विचार जाला आहे. रयतीचा बहुत वजा दिलासा करून, कीर्दी मामुरी करऊन साहेबांच्या किल्ल्या कोटाची मदती करावी लागते. तरी साहेबीं आह्मां वतनदारावरी कृपादृष्टीनें पाहोन, आमची वतनें फती हकलाजिमे जे आहेत, ते आमचे आमचे दुमाला केली पाहिजे, ह्मणून अर्ज केला. त्यावरून हकीकत मनास आणून पाहातां, वतनदारांचीं वतनें वतनदारांच्या दुमाला केल्या विरहित पोटतिडीक लागोन मुलूक मामूर होत नाहीं, व मुलकाचा जपत रपत होत नाहीं, ऐसे कळों आलें. त्यावरून देशमुख व देशकुलकर्णी व मोकदम व बाजे मिरासदार यांचीं वतनें व इनामती व इसापती व हकलाजिमे इनामतीची सेतें, सेरिया याची याचे दुमाला केली असेती. तरी तुह्मी सदरहू लिहिल्याप्रमाणें वर्तणूक करणे. तालीक लेहून घेऊन असल परतोन याजपासीं देणें. जाणिजे. छ. १३ मोहरम मोर्तब सुद.''