Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

लेखांक २१.

श्री.

१५७९ वैशाख वद्य १२.
''राजश्री बाबाजी जुंझारराव मरळ देशमुख खंडो सजणाची देशपांडे ता। कानदखोरे गो। यांसि.

श्नो गोविंद सामराज नामजाद सुभा प्रांत मावळ आसिर्वाद सु॥ सन सबा खमसैन मया अलफ ता। मजकूरची रयत तजावजा जाहाली ह्मणून वर्तमान विदित जाहले. त्यास, तुह्मी जमीदार असतां मुलुकची संचणी करीत नाही हे गोष्टी कार्याची नाही. तुह्मास दस्त भरून द्यावे लागेल. मुलुकचे संचणी करावयास अंतर केलिया कार्यास येणार नाही. तरी तुह्मी रयत तजावजा होऊन न देणे. माहालिची संचणी करणे. राजश्री माणको पिलदेव याजकडे जाऊन, बोलीचाली करून रयतीस मशागतीस लावणे. या गोष्टीस हैगैवर न घालणे. जाणिजे छ २५ रजब या कामास हिरोजी सोनावणी पाठविला. यासी रुपये १० एक देणे. छ. मजकूर.''

लेखांक २२.

१५८८ माघ शुध्द १०.
''महजरनामा सके १५८८ पराभवनाव सवछरे माहा सुध दसमी वार गुरुवार तदिनी हाजीर मजालसी गोत व मातुश्री आवाजी स्थल मुकाम सो। धानीब ता। कानदखोरे.

मातुश्री आउसाहेब वेदमूर्ति

खंडनाक व भिवनाक वरगण ता। मजकूर

सदरहू गोत बैसोन, बाबाजी जुंझारराव देसमुख तर्फ कानदखोरे याचे भाऊ मलोजी पतंगराव या हरदो जणामध्यें वृत्तीचा कथळा होत होता. त्याबद्दल सदरहू गौत बैसोन हरदो जणाचे वाटे केले व घरातून वेगले निघाले. ते वख्ती घरी जे कांहीं गुरढोर व पैके व गला व बाजे जिनस जे होते. ते कुल वाटून दिधले. कांहीं एक जरा उबार ठेविला नाहीं. या खेरीज वृत्तीचा वाटा मलोजी पतंगराव यासि बाबाजी जुंझारराव देसमुख यापासून वाटा देवविला. टके २५० अडिचशे टके यासि जागा.

हक तपेसमधें पैकीं देहाये २ एकूण एक टके

एकूण टके २५० अडिचसे देवविले. तेणेप्रमाणे मलोजी पतंगराव याणी मान्य करून तकसीम घेतली. पुढे बाबाजी जुंझारराव यासि व मलोजी पतंगराव यासि मिरासीच्या कथलियाचे बाबे अर्था अर्थी समंध नाही व घरामधे हि जे काहीं वस्तभाव गला व पैका व बाजे जिनस होते, ते गोताने वाटून देवविले. तेहि मलोजी पतंगराव यानी मान्य करून तकसीम घेतली. पुढे काही हिला हरकती हरएक बाब करावयास गरज नाहीं. लेकराचे लेकरी मिरासीचा व वस्तभाव गला व पैका व बाजे जिनस जो होता त्याचा कथला तुटला असे. यांसि हरदो जणामधे जो कोण्ही इस्किल करील तो देवाचा व दिवाणीचा खोटा व तपेसमधे हरदो गाव दिधले आहेत. तेथील देसमुखीचा भोगवटा खवस टका व गावटका व पाटास व वर्‍हाडास दर एकास रुपये .।. सालाबाद चालिले आहे ते बाबाजी जुंझारराव याणीच घ्यावे. मालोजी पतंगराव यास कांहीं समंध नाही. हा महजर सही. सु॥ सबा सितैन अलफ छ ९ साबान. व हर दो गावीं जकातीचा हसील होईल. त्यास जो विश्वा देसमुखीचा हक होईल, तो बाबाजी जुंझारराव याणीच घ्यावा मलोजी पतंगराव यासि काही समंध नाही. गावटका व खवसटका व वर्‍हाडास व पाटस रुपये .।. एकूण बाबी च्यारी बाबाजी जुंझारराव याणी घ्यावे. वरकड किरकोल कमाविसी हक मलोजी पतंगराव याणी घ्यावे.''