Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सोळावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २३.
(फारसी मजकूर) १५८९ मार्गशीर्ष शुध्द १४.
''कौलनामा बेस्मी बाबाजी जुंझारराव देसमुख ता। कानदखोरे सु॥ समान सितैन सन १०७७ कारने कौलनामा लिहून दिधला ऐसा जे. ना। मजकुराने एऊन जाहीर केले जे, आपन सिवाजीच्या दहशती करून पळून साहेबासी आलो आहे. तर साहेबी मेहरबानी करून गडाखालिया राहावयां जागा दिधली पाहिजे व कौल दिधला पाहिजे की, खातिरजमा करून लेंकरबाहाजी साहेबा कदमासी राहून. यावर साहेबी त्याची अर्ज खातिरेस आनऊन गरीबीवर नजर देऊन, सोनमेटी राहावयास जागा दिधली असे की, तुह्मी आपले भाऊबंदासी खातिरजमा राखोन जागा मजकूरवर राहोन कोन्हे बाबे मुलाहिजा न धरने. मा। हा कौल सही मा॥ ''
तेरीख १२ जमादिलाखर
सन १०७७
लेखांक २४.
१६०४ श्रावण वद्य २.
'' राजश्री कान्होजी जुंझारराऊ देसमुख
ता। कानदखोरें साहेबाचे सेवेसी :-
विनंति सेवक विठोजी प्रभु देसकुळकर्णी ता। मजकूर जोहार विनंति. सु॥ सलास समानीन व अलफ उपर आपण व आपला तकसीमदार विसाजी गोज प्रभु ऐसे इ॥ बटाई पासून सात पांच साले चाकरी गेलो. मागे तिमाजी मादाजी यानी गावकुळकर्णी खादली. त्यावर सन इहिदे समानीनामध्यें विसाजी गोजप्रभु वतनावर आले. त्यावरी आपनास एणे लागले. देसकुळकर्णी गावकुळकर्णी चालविली. सन इसने तिमाजी प्रभुकडे गेले. साल मजकुरी देसकुळकर्णी गावकुळकर्णी आपले सांभाळी विसाजीने एक साल केली. ऐसियासि आपले ह्मातारपण ह्मणुउनु साला जाबास न पुरवे ह्मणौउनु साहेबास वर्तमान सांगितले. त्यावर साहेबीं मनास आनुनु आमच्या राजीपणे विसाजी गोजप्रभुचा तह करून, कारभार एकमते करावा. आपण केले ते विसाजीने केले व विसाजीने केले ते आपण केले. ऐसा तह साहेबीं आमच्या राजीपणे केला. हक उत्पन्नाची विल्हे ता।
देसकुलकर्णी हक टके १५३ गांवकुळकर्णी १६ ता।
यासि ता। १२ विसा
१०३ विसाजी प्रभु ४ विठोजी
५० विठोजी प्रभु १६
-------
१५३
लिहिनियासि आपला
मूल दादाजी फडी
हाताखाली ठेवावा.
एणे प्रों। विल्हे केली. यासि परसपरे मनामधे किंत जरी करील त्यास श्रीची आण व साहेबाच्या पायाची आण असे लिहिले.
सही छ १५ साबान हे विनंति
गोही
त्रिंबक रंगनाथ खासनीस
देवजी पाटील बाहीर
अजहती देसमुख ता। मा। + + + + +
+ + + + +
गोजाजी लिह्मण महालिंग जंगम
मठपति ता। मा।