Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

लेखांक २६.

१६१० ज्येष्ठ शु॥ १२.
(फारशी मजकुर)

''कौलनामा ता संकराजी जुंझारराऊ देसमुख ता। कानदखोरे सु॥ सन हजार १०९८ कारणे बादे कौलनामा ऐसाजे तुवा बापूजी मोकदम मौजे पावे ता। मजकूर याणे मालूम केले जे, देसमुख मा। गणीमाचे ता। होता. हाली मुलकात येउनु आपले ता। देहबदेह लावणी करील, मुलूक वसाहती करील, आणि हजूर रुजू होईल, ह्मणउनु मालूम केले. बा। मालूमाति खातीरेस आणून, तुज कौल सादर केला असे. तर तुवा आपली खातीरजमा राखोन सुखें येउनु, आपले ता। अबदानी करणे. आणि हुजूर येउनु रुजू होणे. ता। मा। अबादानी वसाहती करणे. अबादानी केलियाने तुझा मजुरा होईल. तर तुवा सुखे आपली खातीरजमा राखोन येणे. कोन्हे बाबे शक अदेशा न धरणे. बेशक होउनु सुखे येणे दरीं बाब कौल असे. मोर्तब सुद.''

तेरीख १०
साबान.

लेखांक २७.

श्री

१६१२ आषाढ शुध्द ८.

''मा। राजश्री कान्होजी जुंझारराऊ देसमुख ता। कानदखोरे यासि रामचंद्र नीलकंठ सु॥ इहिदे तिसैन अलफ तुह्मी विनंतिपत्र पाठविले ++++ न वर्तमान कळों आले. आपण प्रचंडगडीचे बाबे खटपट करून, गड हस्तगत करून दिल्हा. कापत गनीम गडावरी आला होता. ते समईहि कस्त करावयाची ते केली; ह्मणून कितेक तपसिलें लिहिलें. त्यावरून मुजरा जाला. कष्ट मेहनत केलीया गोमटेंच होईल. आपणास गनीमानें धरून नेलें होतें, परंतु हर इलाज करून प्रचंडगडास आलों. किहीम गडी च होता. आपण एकनिष्ट ह्मणोन. तरी तुह्मी एकनिष्ट, ए गोष्टींचा भरंवसा आहे. पुढें कितेक कार्य-प्रयोजनें होणें आहेत. राजगड सिंहगड हे किले हस्तगत जाले पाहिजेत. तरी एविर्शीहि खटपट तरतूद करून हस्तगत होत तें करणें, आणि आपले विशत्कारे गोमटें व मुजरा होए ते करून दाखविणें. ए विशे भरोसे तुमचे मानिले आहेत. त्याचे सारिखी वर्तणूक करवयास आळस न करणें. हरएकविसी आपला दिलासा असों देणें. जाणिजे छ ६ सौवाल.''