Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

लेखांक २५.

श्री.

१६०४.

''राजश्री राउसाहेब देसमुख तर्फ कानदखोरे
साहेबाचे सेवेसी.

सेवक विसाजी गोज प्रभु देशकुळकर्णी तर्फ मजकूर सेवेसी विनंती सु॥ सलास समानैन व अलफ उपरी ई॥ दाटाई पासून आपण चाकरीस गेलो. त्यावरी सन इहिदे समानीनामध्ये मिरासीस आलो. त्यावरी मागे तिमाजी व गदाजी तकसिमदार इही देसकुळकर्ण व गावकुलकर्ण हक उत्पन्न खादले होते. ऐसियासि आपण आलियावरी इहिदेचे साले, देशकुळकर्ण चालवावयास साहेबाच्या मते कारबार सेवकाचे स्वाधीन केला. आपण आपला जोगजोड असावा ह्मणून, आपला भाऊ आवजी प्रभु राजश्री आबाजी प्रभु कुलकर्णी तर्फ चाडवे याचे येथे होता, त्यासी बोलाविले व राजश्री विठोजीकाका तर्फ मोसेखोरा होते त्यास हि बोलाऊ पाठविले. त्यावरी राजश्री विठोजी काका आलियावरी कारकिर्दी राजरी केशोराम हवालदार व राजश्री गदाजी प्रभु मजमुदार ठाणे मु॥ मोजे विंझर येथे चाहुडीस साहेबा हुजूर आपण दो हि रुमाल एक देशकुलकर्णीचा व एक गावकुलकर्णाचा ऐसे दो हि रुमाल विठोजीकाकापुढें ठेविले की, तुह्मास चालेल तो एक रुमाल आपणा- स्वाधीन करून घेणे. त्यावरी विठोजीकाका इही दो हि रुमाल सेवकाचे आधनी केले, आणि जे तुह्मी द्याल ते घेऊन ह्मणवून उतर दिल्हे. इतकियांत ते साल गुदरले. इसने तिमाजी प्रभूकडे लागले. हाली सालमजकूर सनसलासाकारणे सेवक साहेबास साक्ष करून गावकुलकर्णे १६ सोला व देसकुलकर्ण ऐसें दोही हि राजश्री विठोजीकाका स्वाधीन केली. त्यावरी राजश्री विठोजीकाका इही साहेबा हुजूर कथळा केला कीं, देसकुलकर्णाचा मुशाहिरा १५३. एकसे त्रीपन पैकी तिही द्यावे टके ५७  * ''